Vishrambaug Police | वाहन चोऱ्या करणाऱ्या एकाला विश्रामबाग पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – वाहन चोऱ्या करणाऱ्या एकाला विश्रामबाग पोलिसांनी (Vishrambaug Police) सापळा लावून अटक (Arrest) केली आहे. त्याच्याकडून 3 वाहन चोरीचे (Vehicle thief) गुन्हे उघडकीस आले आहेत. दत्ता वामनराव निकम (वय 21, धनकवडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. vishrambaug police arrest one criminal

शहरात वाहन चोऱ्या आणि लुटमारीच्या घटना सुरूच आहेत.
त्यामुळे गुन्हे शाखा (Crime Branch) आणि स्थानिक पोलिसांना या घटना रोखण्यासाठी तसेच चोरट्यांना पकडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
त्यानुसार पोलीस हद्दीत गस्त घालत आहेत.
यादरम्यान विश्रामबाग पोलीस गस्त घालत असताना त्यांना येथील राजेंद्रनगर परिसरातील तेंडुलकर गार्डनजवळ एकजण नंबर प्लेट नसलेली गाडी घेऊन जात असताना दिसून आला.
त्याला पकडले व दुचाकी घेऊन त्याची चौकशी केली.
त्यावेळी त्याने ही दुचाकी कुमठेकर रस्त्यावरून चोरली असल्याचे कबुली दिली.
यानंतर सखोल तपासत त्याच्याकडून 3 गुन्हे उघडकीस आले आहेत.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय टीकोळे, पोलीस निरीक्षक कुंडलिक कायकुडे, उपनिरीक्षक राकेश सरडे, गणेश मोकाशी, संजय दगडे, बाबासाहेब दांगडे, धीरज पवार, विठलं खिलारे, हेमंत पालांडे, प्रशांत शिंदे, सात्तापा पाटील, अभिजित गोंजारी यांच्या पथकाने केली आहे.

Wab Title :- vishrambaug police arrest one criminal

हे हि वाचा

17 जून राशिफळ : ‘या’ 4 राशींचे चमकणार नशीब, ग्रह-नक्षत्रांचे संकेत, इतरांसाठी असा आहे गुरुवार

‘या’ IPS अधिकाऱ्याची संपत्ती होणार जप्त; राजस्थान, गुजरात येथे आहे प्रॉपर्टी

शेतकर्‍यांना मोठा दिलासा ! मोदी सरकारने DAP वर वाढवली 700 रु. सबसिडी, आता इतक्या रुपयांना मिळेल खत

Gold-Silver Price Today | सोने झाले स्वस्त, चांदीचे सुद्धा रेट घसरले, जाणून घ्या आजचा भाव