सांगली : पठाणी वसुली केल्याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल

सांगली :  पोलीसनामा ऑनलाईन

पठाणी वसूली करणार्‍या दोन खासगी सावकारांविरोधात विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . विशाल विलास कुडचे, गणेश अनिल वायदंडे (रा. विश्रामबाग )  अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी स्वप्नील प्रकाश गळतगे याने फिर्याद दिली आहे.पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा याप्रकरणी अधिक तपास करत आहेत .

[amazon_link asins=’B0748NPV86,B0757K3MSX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’fd0e39eb-b0e4-11e8-8644-f13dbb14f14d’]

ऑक्टोबर २०१७ मध्ये व्यवसायासाठी पैशांची गरज असल्याने स्वप्नील गळतगे यांनी सांगलीतील एका बँकेत कर्जासाठी अर्ज दिला होता. त्यावेळी बँकेतील एका कर्मचार्‍याने विशाल कुडचे यांच्याकडून प्रतिमहिना सात टक्के व्याजाने तातडीने पैस मिळतील असे सांगितले.त्यावेळी गळतगे यांना  पैशांची गरज असल्याने त्याने विशाल कुडचे याच्याकडून ४ लाख रूपये घेतले. त्यावेळी कुडचेने त्यांच्यकडून दोन कोरे धनादेश, शंभर रूपयांचा एक मुद्रांक सही करून घेतला. तसेच चार महिन्यांचे व्याज एक लाख आठ हजार रूपये कापून घेतले. व्याज कापून राहिलेली रक्कम गळतगे यांची  बँक खात्यावर भरली. त्यावेळी दर आठवड्याला वीस हजारांचा हप्ता देण्याची अट कुडचे याने घातली होती. त्यानंतर टप्प्याटप्प्याने गळतगे यांनी  त्याला ४ लाख ३८ हजारांची रक्कम दिली होती. तरीही अजून ३ लाख ९५ हजार रूपयांची बाकी असल्याचे सांगत कुडचे याने गळतगेसह त्यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकीही दिली. त्यानंतर गणेश वायदंडे आणि कुडचे याने गळतगे कुटुंबियांना वारंवार त्रास देण्यास सुरूवात केली. त्याच्या सततच्या त्रासाला कंटाळून गळतगे यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्याशिवाय पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांच्याकडेही तक्रार दिली होती. त्याची दखल घेत कुडचे व वायदंडे यांच्याविरोधात खासगी सावकारी अधिनियम १९४६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
‘एसपीं’चा सावकारांना  पहिला दणका
 पठाणी वसूली करणार्‍या सावकारांविरोधात पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी अ‍ॅक्शन प्लॅन तयार केला आहे. त्याच प्लॅनचा पहिला दणका अधीक्षक शर्मा यांनी मंगळवारी रात्री दिला आहे. खासगी सावकारी करणार्‍या दोघांविरोधात विश्रामबाग  पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता जिल्ह्यातही सावकारांविरोधात कारवाईची मोहीम तीव्र करण्याचे संकेत यातून शर्मा यांनी दिले आहेत.
सावकारांविरोधात तक्रारी देण्याचे आवाहन 
दरम्यान पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी सावकारांविरोधात अ‍ॅक्शन प्लॅन तयार केला आहे. त्यानुसार त्यांनी सर्व अधिकार्‍यांना विशेष सूचनाही दिल्या आहेत. त्यानुसार ज्या नागरिकांना सावकारांकडून त्रास दिला जात आहे तसेच दमदाटी केली जात आहे अशांच्या विरोधात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कार्यालयात तक्रार देण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांनी केले आहे.