Vishrambaug Pune Police | घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला विश्रामबाग पोलिसांकडून अटक (Video)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Vishrambaug Pune Police | पुणे शहरामध्ये घरफोडीचे गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला (Criminal On Police Records) विश्रामबाग पोलिसांनी अटक केली आहे (Arrest In House Burglary Case). त्याच्याकडून दोन गुन्हे उघडकीस आणून 4 लाख 9 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. जयवंत उर्फ जयड्या गोवर्धन गायकवाड (वय-38 रा. आंबेडकर वसाहत , गणेश खिंड, पुणे) असे अटक केलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.

पुणे शहरात विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास पथकाने घटनास्थळी भेट देऊन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. यामध्ये घरफोडीचे गुन्हे करणारा जयवंत उर्फ जयड्या गायकवाड असल्याचे निष्पन्न झाले. त्याचा शोध घेत असताना तो पुणे रेल्वे स्टेशन परिसरात असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विश्रामबाग, शिवाजीनगर पोलीस स्टेशन परिसरातील सीसीटीव्ही तपासून त्याचा चार दिवस शोध घेऊन त्याला शिताफीने अटक केली. त्याच्याकडे केलेल्या सखोल चौकशीत त्याने दोन ठिकाणी घरफोडी केल्याचे समोर आले. त्याच्याकडून गुन्ह्यातील चार लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त प्रवीण पवार, अपर पोलीस आयुक्त प्रवीणकुमार पाटील,
पोलीस उपायुक्त संदिप सिंह गिल्ल, सहायक पोलीस आयुक्त साईनाथ ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली
वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपाली भुजबळ, पोलीस निरीक्षक गुन्हे अरुण घोडके, पोलीस उपनिरीक्षक मनोज बरुरे,
सहायक पोलीस फौजदार राकेश गुजर, पोलीस अंमलदार रेवण कंचे, अशोक माने, मयुर भोसले, गणेश काठे, महावीर वलटे,
आशिष खरात, मोरे, पाटील, शेरखाने, अर्जुन थोरात, बाबर यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Amol Kolhe | केंद्रातील सरकार बदलणार, काळ्या दगडावरची रेष – डॉ. अमोल कोल्हे

Maval Lok Sabha | मावळ लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती

Baramati Pune Crime | पुणे : वाढीव वीज बिलाच्या कारणावरुन महिला कर्मचाऱ्यावर कोयत्याने वार, उपचारादरम्यान मृत्यू