Vishrambaug Traffic Divsion Pune | विश्रामबाग वाहतूक विभागांतर्गत नो-पार्किंगबाबत वाहतूक शाखेकडून अंतिम आदेश जारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Vishrambaug Traffic Divsion Pune | पुणे शहरातील वाहतूक सुरक्षित व सुरळीत राहण्याच्या अनुषंगाने पुणे शहर वाहतूक शाखेने (Pune Traffic Police) यापूर्वी विश्रामबाग वाहतूक विभागांतर्गत काढलेल्या तात्पुरत्या आदेशांवर प्राप्त हरकती व सूचनांचा विचार करुन अंतिम आदेश जारी केले आहेत.

या आदेशानुसार टिळक स्मारक मंदिर प्रवेशद्वाराच्या भिंतीलगत २० मीटर व नारळीकर इन्स्टिट्यूटकडून टिळक स्मारक मंदिरकडे येताना (कुमार स्टेशनरी व झेरॉक्स दुकान) रस्त्याच्या उजव्या बाजूस ५० मीटरपर्यंत नो पार्किंग करण्यात येत आहे.

हे आदेश अग्नीशमन, पोलीस वाहने, रुग्णवाहिका आदी अत्यावश्यक सेवेतील वाहनांसाठी लागू नसतील असेही वाहतूक शाखेचे पोलीस उप-आयुक्त रोहिदास पवार यांनी काढलेल्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Vasant More-Pune Lok Sabha | पुणे लोकसभेसाठी वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे यांनी भरला अर्ज

Pune Police Seized Firearms | पुणे पोलिसांकडून 42 पिस्तुल, 74 जिवंत काडतुसे जप्त; 28 गुन्हेगार गजाआड

JM Road Firing Case Pune | पुण्यात बापानेच दिली मुलाला गोळ्या घालण्यासाठी 75 लाखाची सुपारी! पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितली हकीकत, धक्कदायक कारण आलं समोर (Video)