पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Vishrantwadi Pune Crime News | अनैसर्गिक अत्याचार (Unnatural Torture) करुन त्याचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन एका ज्येष्ठाची गेल्या दीड वर्षांपासून छळवणुक सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी (Vishrantwadi Police) एका तरुणाला अटक केली आहे.
प्रिन्स प्रेमकुमार सिंग Prince Premkumar Singh (वय २४, रा. मुंजाबा वस्ती, धानोरी) असे या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी एका ५७ वर्षाच्या नागरिकाने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गेल्या दीड वर्षापासून हा प्रकार सुरु होता.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रिन्स याने फिर्यादी यांना भरपूर दारु पाजली. दारुच्या नशेत फिर्यादी झोपेत असताना त्यांचे कपडे काढून त्यांच्यावर अत्याचार केला. त्या अवस्थेतील अश्लिल फोटो काढले. हे अश्लिल फोटो, नातेवाईक, गल्लीतील लोकांना दाखवण्याची व चाकूने जीवे मारण्याची धमकी दिली. फिर्यादीच्या नावार मोटारसायकल व मोबाईल घेतला. वारंवार २ हजार, ५ हजार रुपये असे करुन जवळपास २० ते २५ हजार रुपये घेतले. ३१ ऑक्टोबर रोजी दुपारी प्रिन्स हा फिर्यादीच्या घरी आला. चाकूचा धाक दाखवून तुम मेरेको अभी के अभी ५ हजार रुपये दो, वरना मै तुमको और तुम्हारे घर वालोंको मार डालुंगा, और तुम्हारे फोटो भी सब तुम्हारे रिश्तेदारों को दिखावुंगा असे म्हणून जीवे मारण्याची धमकी देऊन ५ हजार रुपयांची मागणी केली. त्यामुळे घाबरुन फिर्यादी यांनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक कदम तपास करीत आहेत.