विश्व हिंदू सेनेचं आंदोलन की स्टंटबाजी ? ज्या ‘नेपाळी’ युवकाचे मुंडन केलं, तो तर..

वाराणसी : वृत्तसंस्था – नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी आयोध्येबाबत केलेल्या विधानावरून भारतातील काही संघटना आक्रमक झाल्या आहेत. नेपाळी पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी भारतातील आयोध्या बनावट असून खरी आयोध्या नेपाळमध्ये आहे. तसेच प्रभूराम हे भारतीय नसून नेपाळी असल्याचे वक्तव्य केले होते. यावरून विश्व हिंदू सेनेने एका युवकाचे मुंडन केले होते. हा युवक नेपाळी युवक होता असे सांगण्यात आले तसेच मुंडन करण्यात आलेल्या युवकाच्या डोक्यावर जय श्रीराम लिहीण्यात आले, हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल करण्यात आला होता.
https://m.facebook.com/story.php?story_fbid=3108336075881791&id=100001162881775
सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ गंगा किनाऱ्यावरील एका घाटावर बनवण्यात आला होता. नेपाळ पंतप्रधान यांच्या विधानाचा निषेध करण्यासाठी विश्व हिंदू सेनेने हे आंदोलन केले होते. तसेच वाराणसीत पोस्टर्सबाजी करण्यात आली होती. यामध्ये नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी माफी न मागितल्यास भारतात राहणाऱ्या नेपाळी नागरिकांना याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला होता. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या घटनेचा पोलिसांनी तपास सुरु केला. पोलिसांनी केलेल्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे.

वाराणसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या युवकाचे मुंडन करण्यात आले होते, तो युवक नेपाळी नसून भारतीयच आहे. त्याचा जन्म वाराणसीत झाला आहे. त्याचे आधार कार्ड, मतदान कार्ड तपासण्यात आले. आंदोलनकर्त्यांना तो पहिल्यापासुन ओळखत होता. युवकाने मुंडन करुन घेण्यासाठी त्याला एक हजार रुपये देण्यात आले होते. पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत सहा जणांना अटक केली आहे. पोलिसांनी व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या युवकाचा शोध घेतला. तो वाराणसीमधील जल संस्थान सरकारी कॉलनीत राहत होता. त्याचे आई-वडील दोघेही सरकारी नोकरी करतात. हा युवक आंदोलनकर्त्यांना ओळखत असून, व्हिडीओ बनवण्यासाठी त्याला एक हजार रुपये देण्यात आले होते.

अरुण पाठक नावाच्या एका व्यक्तीने 16 जुलै रोजी त्यांच्या फेसबुक अकाउंटवरुन एक व्हिडीओ जारी केला होता. या व्हिडीओबाबत भेलूपुरमध्य गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्हिडीओत शेजारील राष्ट्रातील व्यक्ती आणि राजकीय नेत्यांबद्दल अश्लील शब्दात वादग्रस्त विधान करण्यात आली होती. वाराणसी पोलिसांनी शुक्रवारी 4 जणांना आणि शनिवारी दोघांना अटक केली आहे. संतोष पांडे, आशिष मिश्रा, राजू यादव, अमित दुबे, राजेश राजभर, जय गणेश शर्मा अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर विश्व हिंदू सेनेचे अध्यक्ष आणि मुख्य आरोपी अरुण पाठक यांना अद्याप अटक झालेली नाही.
https://m.facebook.com/story.php?story_fbid=3108456022536463&id=100001162881775