Vishwanath Kelkar | ठाणे महापालिकेचे उपायुक्त विश्वनाथ केळकर यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा, प्रचंड खळबळ; जाणून घ्या प्रकरण

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – ठाणे महानगरपालिकेचे (Thane Municipal Corporation) उपायुक्त विश्वनाथ केळकर (Vishwanath Kelkar) यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल (FIR) करण्यात आला आहे. (14 जुलै) बुधवारी कापूरबावडी पोलिस ठाण्यात (Kapurbawdi Police Station) कोरोना रुग्णालयातील एका 38 वर्षीय महिला परिचारिकेने याप्रकरणी फिर्याद दिली आहे. यावरून पोलिसांनी उपायुक्त विश्वनाथ केळकर (Vishwanath Kelkar) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,
ठाणे महानगरपालिकेचे बाळकूम येथे ग्लोबल कोरोना रुग्णालयात वर्षाआधी पीडित तरुणीची कंत्राटी पद्धतीने परिचारक म्हणून भरती केली होती.
त्या दरम्यान उपायुक्त विश्वनाथ केळकर यांच्याकडे कोरोना रुग्णालयाचा पदभार होता.
काही महिन्यांपूर्वी रुग्णालयात काम करत असताना पीडित परिचारिकेनं केळकर यांनी विनयभंग केल्याची तक्रार महापालिका प्रशासनाकडे आणि विशाखा समितीकडे केली.
मात्र, कागदपत्र अपूर्ण असल्याचं कारण देत त्या पीडित महिलेला कामावरून कमी केलं.
याबाबत माहिती भाजप नेत्या चित्रा वाघ यांना समजली.

यावरून चित्रा वाघ यांनी बुधवारी ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजीत सिंग (Jaijit Singh) यांची भेट घेतली.
उपायुक्त विश्वनाथ केळकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
यावरून विश्वनाथ केळकर यांच्याविरोधातील कारवाईच्या हालचाली सुरु झाल्या.
यांनतर पीडित तरुणीनं दिलेल्या फिर्यादीवरून उपायुक्त केळकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल दाखल करण्यात आला.

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

दरम्यान, या प्रकरणी पीडित तरुणी केळकर (Vishwanath Kelkar) विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेली होती.
मात्र, पोलिसांनी तिची दिशाभूल करण्याचे काम केले.
तर पालिकेत जी विशाखा कमिटी नेमली आहे.
ती कमिटीदेखील केळकर यांनी नेमली आहे.
मुख्यतः म्हणजे महापालिका आयुक्तांनी (Municipal Commissioner) देखील याची दखल घेतली नाही.
या दरम्यान,
भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी आक्रमक पवित्रा घेत जोपर्यंत डॉ. केळकर यांना कामावरून काढत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाहीत, असं त्यांनी म्हटलं होतं.

Web Titel :-  Vishwanath Kelkar | head of thanes municipal covid 19 hospital and deputy commissioner of thane municipal corporation vishwanath kelkar booked for molestation case

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Aadhaar Update | तुमच्या आधार कार्डमध्ये चुकीचा मोबाईल नंबर आणि ई-मेल नोंदला गेलाय का, ‘या’ पद्धतीने तपासा

Today petrol price | पेट्रोल डिझेलच्या दरात आज पुन्हा दरवाढ; जाणून घ्या आजचे दर

Pune Crime | एमडी डॉक्टर सुजित जगतापने या अगोदरही लावला होता महिला डॉक्टरच्या बाथरूममध्ये स्पाय कॅमेरा