vishwas nangare patil | कोरोना व्हॅक्सीनच्या नावाखाली ग्लुकोज पाणी दिल्याचा पोलिसांना संशय, डॉक्टर पती-पत्नीसह 10 जण अटकेत

मुंबई न्यूज (Mumbai News) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  मुंबईतील कांदिवलीमधील बनावट लसीकरण (Fake vaccination) उघडकीस आल्यानंतर कांदिवली पोलिसांनी (Kandivali police) गुन्हा नोंदवत आतापर्यंत या प्रकरणी एका डाॅक्टर दाम्पत्यासह एकूण 10 जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 12 लाख 40 हजाराचा ऐवज जप्त केला असल्याची माहिती मुंबईचे सह आयुक्त विश्वास नांगरे पाटील (vishwas nangare patil) यांनी दिली आहे. या प्रकरणी आरोपीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्ह्यासह, बनावट औषधांसदर्भातील गुन्हे दाखल केले असल्याचे देखील विश्वास नांगरे पाटील (vishwas nangare patil) यांनी सांगितले आहे. या टोळीकडून एकूण 1 हजार 343 लोकांचे लसीकरण करण्यात आले असून लसींच्या नावाखाली ग्लुकोजच्या पाण्याचा (glucose water) वापर केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. vishwas nangare patil | suspectes are giving glucose water under name covid vaccine 10 arrested including doctor couple

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

महेंद्र प्रताप सिंह (39) , संजय गुप्ता (29), चंदन सिंह (32), नितीन मोंडे (32) , मोहंमद करीम अकबर अली (19), गुडिया यादव (24), शिवराज पटारिया (61) , नीता शिवराज पटारिया (60) , श्रीकांत माने (39) आणि सीमा अहुजा (42) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

या प्रकरणात आतापर्यंत मुंबईत कांदिवलीसह बोरीवली, वर्सोवा, खार, भोईवाडा, बांगुरनगर पोलीस ठाण्यात एकूण 7 गुन्हे दाखल केले आहेत.
समतानगर आणि अंधेरीतही असे प्रकार उघडकीस आले आहेत.
याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 200 पेक्षा अधिक लोकांचे जवाब नोंदवले आहेत.
114 बनावट प्रमाणपत्रही जप्त करत एसआयटी स्थापन केल्याची माहिती
पाेलीस सहआयुक्त विश्वास नांगरे-पाटील (vishwas nangare patil) यांनी दिली.
महेंद्र हा नऊ बनावट लसीकरण शिबिरांचा प्रमुख असून, संजय हा सर्व गुन्ह्यात सहआरोपी आहे.
राजेश हा कोकिलाबेन रुग्णालयात सेल्स अधिकारी होता.
तसेच चंदन रामसागर हा डेटा सेंटरमधील कर्मचारी आहे. त्याला मॅनेज करून हे सर्व काम सुरू होते.
गुडिया यादव, डॉ. पटारिया यांचा सहभागही निश्चित झाला आहे.
या संपूर्ण गुन्ह्यांचा बारकाईने तपास होणे अपेक्षित असल्याने एसआयटी स्थापन
केल्याचे पाटील यांनी नमूद केले आहे.

 

फसवणूकीसाठी हा फंडा अवलंबला होता

एखाद्या कंपनीला किंवा सोसायटीला लसीकरण करून घ्यायचे आहे का, याची माहिती गोळा केल्यानंतर शिबिर आयोजित करून ही टाेळी बनावट लसीकरण करत होती. शिवम हॉस्पिटल, चारकोप, कांदिवली येथून लसींचा पुरवठा केला जात होता. याचे मालक डाॅ. शिवराज पटारिया, त्यांची पत्नी डाॅ. नीता पटारिया आहेत. शिल्लक लसींची माहिती त्यांनी पालिकेला दिलेली नाही. पटारिया दाम्पत्याला अटक झाली आहे. यात मुख्य आरोपी महेंद्र सिंह असून, त्यानेच हा सर्व प्लॅन आखल्याचे समाेर आले आहे.

Web Title : vishwas nangare patil | suspectes are giving glucose water under name covid vaccine 10 arrested including doctor couple

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Know your Rights | जर एखाद्या दुकानदारानं मुदत संपलेलं (एक्सपायर) सामान दिलं तर इथं करा फोन, तात्काळ होईल कारवाई; जाणून घ्या