Vishwas Nangare Patil | विश्वास नांगरे पाटील हे महाविकास आघाडी सरकारचे माफिया; भाजप नेते किरीट सोमय्यांचा आरोप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Vishwas Nangare Patil | भाजपचे जेष्ठ (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) हे सतत महाविकास आघाडीवर (Maha vikas Aghadi) आरोप करीत असतात. मागील अनेक दिवसापांसून त्यांनी आघाडी सरकारच्या नेत्यांवर अनेक गैरव्यवहाराचे गंभीर आरोप करीत आहेत. नुकतंच सोमय्यांनी राष्ट्रवादीचे नेते (NCP) आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hassan Mushrif) यांच्यावर घोट्याळ्याचा आरोप केला. यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली. सोमय्यांनी आघाडी सरकारमधील मंत्र्यावर आरोप करण्याचा सुरसपाटाच लावला आहे. यानंतर त्यांनी एका आयपीएस अधिका-यावरच आरोपाची तोफ डागली आहे. कर्तव्यदक्ष म्हणून ओळखले जाणारे पोलिस अधिकारी, मुंबईचे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील (Vishwas Nangare Patil ) यांच्यावर सोमय्यांनी गंभीर आरोप केला आहे.

किरीट सोमय्या (Kirit Somaiya) म्हणाले की, विश्वास नांगरे पाटील (Mumbai Jt CP Vishwas Nangare Patil) हे महाविकास आघाडी सरकारचे माफिया म्हणून काम करतात, अशा शब्दात त्यांनी गंभीर आरोप केला आहे. तसेच, विश्वास नांगरे पाटील यांनी मला बेकायदेशीरित्या घरात कोंडून ठेवलं, तिथल्या पोलिसांना ते सूचना देत होते. याबाबत, राष्ट्रीय मानवाधिकार यांच्याकडे आपण तक्रार केल्याचेही किरीट सोमय्या यांनी सांगितले आहे.

दरम्यान, किरीट सोमय्यांनी काही दिवसांपूर्वी कोल्हापूर येथे जाऊन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर सव्वाशे कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला.
तर, रत्नागिरीतील एका रिसॉर्टप्रकरणात मंत्री अनिल परब (Anil Parab) यांचेही नाव घेतले होते.
दरम्यान, मुश्रीफ यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत.
त्याबाबतच त्यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय ग्रामविकास मंत्र्यांची भेट घेतली.
तसेच, विभाग, ED यांसह इतरही अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे.
त्यानुसार, आता गतीने तपास सुरू असल्याची माहिती देखील किरीट सोमय्यांनी दिली आहे.

Web Title :- Vishwas Nangare Patil | vishwas nangare patil is mafia of mahavikas aghadi government serious allegation of bjp leader kirit somaiya

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Fire Brigade | Manhole मध्ये कुतुहलमधून वाकून पहायला गेला अन् पडला 15 फुट खोल गटारात; ‘अग्निशमन’च्या जवानांनी काढले सुखरुप बाहेर (व्हिडीओ)

Profitable Shares | ’या’ 4 स्टॉक्समध्ये गुंतवा पैसे; अल्पावधीतच व्हाल ‘मालामाल’, ब्रोकरचा अंदाज

UGC NET Exam Date | यूजीसी नेट परीक्षा शेड्यूल बदलले, आता 6 ऑक्टोबरपासून होणार परीक्षा; ‘इथं’ चेक करा