Vishwas Nangre-Patil | मुंबईतील इमारत दुर्घटनाप्रकरणी इमारत मालक, कंत्राटदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार – विश्वास नांगरे-पाटील

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईत (Mumbai) बुधवारी झालेल्या मुसळधार पावसाचा फटका काही इमारतीला बसला.
मुंबईतील मालाडमधील मालवणी (mumbai malwani building collapse) भागात इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू (Death) झाला.
यामध्ये बालकांचा देखील समावेश आहे.
तसेच या दुर्घटनेत 7 जण गंभीर जखमी झालेत.
ही घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास घडली. या दुर्घटनेची माहिती मिळताच अग्शिमनन दल (Fire Brigade) व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
दुर्घटनेदरम्यान इमारतीत वीस हून अधिक लोक राहत असल्याचा आंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
या दुर्घटना झालेल्या घटनास्थळाची पाहणी सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील (Vishwas Nangre-Patil) यांनी केली आहे.

तौक्ते वादळामध्ये या इमारतीला तडा गेला होता. त्यानंतर चुकीच्या पद्धतीनं बांधकाम केलं गेलं, अशी याबाबत माहिती नांगरे-पाटील यांनी दिली आहे.
तसेच, याप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा (The crime of culpable homicide) दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
असं त्यावेळी सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील (Vishwas Nangre-Patil) यांनी सांगितलं आहे.

अग्नीशमन दलाचे जवान आणि पोलीस तसेच, स्थानिक नागरिकांच्या मदतीने इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या १५ हून अधिक लोकांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आलं आहे.
या इमारत दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 3 ते 15 वयोगटातील 8 लहान मुलांचा समावेश आहे.
तर 7 जण जखमी व्यक्तींपैकी 4 पुरुष आणि 3 महिलांचा समावेश असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
या दरम्यान, खबरदारी म्हणून इमारतही मोकळी करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे.
तेथील रहिवाशांना तातडीने दुसरीकडे हलवण्यात येत आहे.

इमारत दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांचे नावे, साहिल सरफराज सय्यद (वय, 9 वर्ष), आरिफा शेख (वय, 9 वर्षे), शफिक मोहम्मद सलीम सिद्दीकी (वय, 45 ), तौसिफ शफिक सिद्दीकी (वय, 15 वर्ष), एलिशा शफिक सिद्दीकी (वय, 10), अल्फिसा शफिक सिद्दीकी (दीड वर्षे), अफिना शफिक सिद्दीकी (वय, 6 वर्षे), इशरत बानो शफिक सिद्दीकी (वय, 40 ), रहिसा बानो रफिक सिद्दीकी (वय, 40 ), तहेस सफिक सिद्दीकी (वय, 12 वर्षे), जॉन इरान्ना (वय, 13 वर्षे).

इमारत दुर्घटनेत जखमींची नावे, मरीकुमारी हिरांगणा (वय, 30 ), धनलक्ष्मी बेबी (वय, 36 वर्षे), सलीम शेख (वय, 49 ), रिझवान सय्यद (वय, 33 ), सूर्यमणी यादव (वय, 39 ), करीम खान (वय, 30 ), गुलझार अहमद अन्सारी (वय, 26 ).

READ ALSO THIS :

Aurangabad News | औरंगाबादमध्ये वीज कोसळून युवतीचा दुर्देवी मृत्यू, 1 जण गंभीर जखमी

BCCI Big Announcement | इंग्लड दौऱ्यानंतर रंगणार आयपीएलचा थरार; बीसीसीआयने केली मोठी घोषणा