Vision Cup Under-15 Cricket Tournament | ‘व्हिजन करंडक’ अजिंक्यपद १५ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धा; जॅग्वॉर्स इलेव्हन, लायन्स् इलेव्हन, लेपर्डस् इलेव्हन संघांची विजयी सलामी

पुणे : Vision Cup Under-15 Cricket Tournament | व्हिजन स्पोर्ट्स सेंटर तर्फे आयोजित ‘व्हिजन करंडक’ अजिंक्यपद १५ वर्षाखालील टेव्न्टी-२० क्रिकेट स्पर्धेत जॅग्वॉर्स इलेव्हन, लायन्स् इलेव्हन आणि लेपर्डस् इलेव्हन या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून स्पर्धेत विजयी सलामी दिली. (Vision Cup Under-15 Cricket Tournament)
सनसिटी रोड येथील व्हिजन क्रिकेट अॅकॅडमी मैदानावर झालेल्या सामन्यात सुयश दहीभाते याच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर जॅग्वॉर्स इलेव्हन संघाने लेपर्डस् इलेव्हनचा १ गडी राखून पराभव केला. सुयश दहीभाते याने १५ धावात ६ गडी बाद करत अफलातून गोलंदाजी केली. (Vision Cup Under-15 Cricket Tournament)
दक्षीथ माळी याने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर लायन्स् इलेव्हन संघाने टायगर्स इलेव्हनचा ५६ धावांनी सहज पराभव करून विजयी सलामी दिली. दुर्वेश फलक याच्या कामगिरीच्या जोरावर लेपर्डस् इलेव्हन संघाने लिक्स् इलेव्हनचा निसटात पराभव करून पहिला विजय नोंदविला.
या स्पर्धेबाबत अधिक माहिती देताना स्पर्धेचे संचालक आणि संयोजक गणेश जोशी यांनी सांगितले की, १२ ते १५ वयोगटातील युवा क्रिकेट खेळाडूंसाठी तसेच त्यांच्या गुणांना वाव देण्यासाठी, संधी देण्यासाठी व्हिजन करंडक या २०-२० षटकांच्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. व्हिजन क्रिकेट अॅकॅडमीमधील खेळाडुंसाठी आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत एकूण ५ संघ सहभागी झाले आहेत. साखळी आणि बाद फेरीमध्ये होणार्या या स्पर्धेत लायन्स् इलेव्हन, लेपर्डस् इलेव्हन, जॅग्वॉर्स इलेव्हन, टायगर्स इलेव्हन आणि लिंक्स् इलेव्हन या संघांमध्ये विजेतेपदाची चुरस पहावयास मिळणार आहे.
स्पर्धेतील विजेत्या आणि उपविजेत्या संघाला आकर्षक बक्षिस व करंडक मिळणार आहे. सर्वोत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि यष्टीरक्षक याबरोबरच मालिकेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू यांना प्रत्येकी करंडक आणि सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक सामन्यासाठी सामनावीर अशी पारितोषिकांची रेलचेल या स्पर्धेत असणार आहे.
सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
लेपर्डस् इलेव्हनः १७.३ षटकात १० गडी बाद ९६ धावा (अदवय सोनावणे ३२, साहील कुलकर्णी १६, सुयश दहीभाते ६-१५)
पराभूत वि. जॅग्वॉर्स इलेव्हनः १९.१ षटकात ९ गडी बाद ९७ धावा (साई वाळुंज नाबाद २१, सुयश दहीभाते नाबाद २०,
अंकुर खेंगरे १५, वेदांत गावडे); सामनावीरः सुयश दहीभाते;
लायन्स् इलेव्हनः १८.३ षटकात १० गडी बाद १०७ धावा (रणवीर मते ३२, सायन पत्रा १७, निपुण भोसले ३-१६,
रोहन पाटील ३-१२, निरज बोरा २-९, युवराज बेंडागळे २-६) वि.वि. टायगर्स इलेव्हनः ११.५ षटकात १० गडी बाद
५१ धावा (सार्थक वांजळे १८, निपुण भोसले १५, दक्षीथ माळी ४-१७, देवल देशपांडे २-११, जयेश ओझा २-५);
सामनावीरः दक्षीथ माळी;
लिक्स् इलेव्हनः २० षटकात ६ गडी बाद १११ धावा (राधेश आढाव ३९, दुर्वेश सहानी १६, दुर्वेश फलक ३-१३) पराभूत
वि. लेपर्डस् इलेव्हनः १९.४ षटकात ९ गडी बाद ११२ धावा (विग्नेश पेन्नेकर २७, राहूल वर्पे १९, अनवय रायकर १५,
सिद्धार्थ पटवर्धन २-२३); सामनावीरः दुर्वेश फलक;
Web Title :- Vision Cup Under-15 Cricket Tournament | ‘Vision Trophy’ Championship Under-15 Cricket Tournament; Jaguars XI, Lions XI, Leopards XI winning opening
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update