दिल्ली स्पेशल ‘छोले भटुरे’चा आस्वाद घ्यायचाय, पुण्यातलं ‘Oye BC’ (भोले चटूरे) तुमची वाट पाहतंय

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शुद्ध, ताजे पदार्थ आणि घरगुती जेवणं म्हणलं की ‘टमी फुल’. पदार्थ असा हवा की जीभेवर चव रेंगाळली पाहिजे, जेवणानंतर मन तृप्त झालं पाहिजे. असं चटकदार, पोटभर, स्वस्तात मस्त जेवण पुण्याच्या ‘ओय बीसी’ मध्ये मिळतं. खाद्यप्रेमींची झुंबड असलेल्या पुण्यात आता दिल्लीच्या छोले भटुऱ्यांचा आस्वाद घ्यायचा असेल तर ‘ओय बीसी’ मध्ये गेलंच पाहिजे.

तुम्ही पुण्याचे आहात? खवय्ये आहात? तर छोले भटोरेंची मेजवाणी तुमची बालेवाडी रस्त्यावर वाट पाहत आहे.

अनिता आणि अमित मलिक हे दाम्पत्य ओय बीसी (भोले चटूरे) या हॉटेलमध्ये तुमचे स्मित हास्य करत स्वागत करायला तयार आहे. दिल्ली स्टाईलचे पदार्थ तुम्हाला प्रेमाने खाऊ घालणारे हे हॉटेल बालेवाडी हाय स्ट्रिटवर काही महिन्यापूर्वीच तुमच्या सेवेत हजर झाले आहे. ‘ओय बीसी’ हे हॉटेल चालवणारे अमित पेशाने आयटी क्षेत्रातील आहेत तर त्यांची पत्नी पेशाने बेकर आहेत. विशेष काय तर पदार्थ बनवून इतरांना खाऊ घालण्याची या दोघांना प्रचंड आवड आहे. त्यासाठी गलेलठ्ठ पगाराची नोकरी अमित यांनी पणाला लावली, तर अनिता यांनी विप्रोतील आपली नोकरी सोडली आणि स्वत:चा बेलेमोरसी नावाचा बेकरी व्यवसाय सुरु केला. ज्यात त्या केमिकल फ्री केक तयार करुन देतात ज्याची ऑर्डर तुम्हाला 1 ते 2 दिवस आधी द्यावी लागेल. फेब्रुवारीपासून तुम्ही आरोग्यदायी परंतु क्रिमी केमिकल फ्री केकचा देखील आनंद घेऊ शकतात.

bc

जो चवीनं खाणार त्याला ‘छोले भटुरे’ देणार –

छोले भटुरे किंवा इतर उत्तर भारतीय पदार्थ म्हणलं की पहिला विचार मनात येतो, तो म्हणजे अत्यंत हेवी फुड आणि तेलाची तर्रीच तर्री…परंतु हे समीकरण बदलून अनिता आणि अमितने झीरो ऑइल/ बटर/ तूप असलेले छोले तयार केले. भटुरे देखील अत्यंत तेलकट असतात परंतु ‘ओय बीसी’ मधील आइल फ्री छोले भटुरेची युनिक डीश तुमच्या समोर आली तर तुम्ही त्यावर तावच मारालं. ऑइल फ्री स्पेशल छोले भटुरे मिळण्याचं एकमेव ठिकाण कोणतं तर ‘भोले चटूरे’. ऑइल फ्री छोले भटुरेची स्पेशल रेसिपी आहे अमितकडे. एकदा जाऊन चव चाखली नाहीत तर छोले भटुरे खाल्लेच नाही असं समजा.

थोडं खा पण स्वादिष्ट खा –

‘भोले चटूरे’ लिमिटेड, पद्धतशीर पण अत्यंत स्वादिष्ट पदार्थ सर्व्ह करणारं हॉटेल आहे. एकदा खाल्लं तर परत यालं असं मनाला तृप्त करणारे पदार्थ येथे मिळतं. अगदी पैसा वसूल.

बालेवाडी हाय स्ट्रिट पुणे शहरातील उच्चभ्रु, पार्टी प्लेस म्हणून ओळखला जातो. याच हाय स्ट्रिटवर पाकिटाला परवडणारं आणि चविष्ट पदार्थ तुम्हाला प्रेमानं खायला घालणारं हॉटेल म्हणजे भोले चटूरे. एका नजरेत तुम्हाला स्वत:कडे आकर्षित करेल असा अँबियन्स.

bc

या हॉटेलची खासियत काय तर पदार्थ स्टीलच्या, प्लास्टिकच्या ताटात नाही तर पत्रावळीत वाढले जातात. रोज स्टीलच्या ताटात जेवणाऱ्यांनी कधी तरी पत्रावळीतलं जेवण जेवण्यासाठी या हॉटेलला नक्की यावं.

भोले चटूरे या हॉटेलमध्ये पदार्थ तयार करताना आणि सर्व्ह करताना पदार्थाच्या दर्जाची आणि स्वच्छतेची अत्यंत काळजी घेतली जाते. हॉटेलचे स्वयंपाकघर खुलं आहे. जेणे करुन पदार्थ तयार होताना खवय्ये देखील पाहू शकतील. विशेष म्हणजे येथील पदार्थ स्वच्छ पाण्यात तयार केले जातात आणि एकदा स्वयंपाकासाठी वापरलेले तेल पुन्हा वापरले जात नाही.

bc

पदार्थांची स्पेशालिटी –

छोले भटुरे –

ऑइल फ्री छोले आणि हलके-फुलके, आतून मऊ आणि बाहेरुन खुसखुशीत असे भटुरे खाण्याचा स्वाद तुम्ही येथे घेऊ शकतात.

bc

दाल मखनी –

इतर हॉटेलस् पेक्षा ओय बीसीमध्ये पारंपारिक पद्धतीने तयार केलेल्या दाल मखनीची चव येथे तुम्ही घेऊ शकतात. त्यामुळे दाल मखनी संपण्याच्या आत त्यावर ताव मारण्यासाठी तुम्ही तिथं हजर पाहिजे. ओय बीसीकडे दाल मखनीची सिक्रेट रेसीपी आहे, जी तुम्हाला भूरळ पाडेल.

bc

कुलछा –

येथे तंदूर कुलछा नाही तर खास असा स्वत:ची रेसिपी असलेला तव्यावर तयार होणारा अत्यंत मऊ असा कुलछा मिळतो. इथं एक कुलछा नाही तर कुलछांचे विविध प्रकार चाखण्याची संधी तुम्हाला मिळेल. बटाटा कुलछा, चीज कुलछा, पन्नीर कुलछा असे एक ना अनेक कुलछे खाण्याचा आनंद तुम्ही घेऊ शकतात. कुलछा, क्रिमी-बटरी दाल मखनी आणि छोले हे पदार्थ शुद्ध तूपात तयार केले जातात.

bc

सोया चीप –

दिल्लीत सहसा सहज उपलब्ध होणारा पदार्थ कोणता तर सोया चिप, परंतु पुण्यात जर सोया चीपची मजा घ्याची असेल तर शक्यतो मिळणं अवघड. त्यामुळे दिल्ली स्पेशल सोया चीप खायचे असतील तर भोले चटूरे मध्ये जायलाच हवं आणि कधी खाल्लेच नसेल तर प्रेमाने खाऊ घालायला ओय बीसी हाक देते दिमाखात उभं आहे तुमच्या स्वागताला.

याशिवाय तुम्ही पराठा फॅन असाल तर अनेक प्रकारचे पराठे, राईस कॉम्बो अशा पदार्थांचा देखील आस्वाद येथे घेऊ शकतात.

bc

दिल्लीचे स्पेशालिटी असलेले छोले भटुरे खाण्यासाठी तुम्हाला आता दिल्लीत जायची गरज नाही, पुण्यात ओय बीसीमध्ये जा आणि छोले भटुरेवर ताव मारा.

नाष्टा हवा तर ओय बीसी गाठा –

ओय बीसी मध्ये तुम्हाला सकाळच्या नाष्टा देखील हमखास मिळणार, तशी सोयच ओय बीसीनं आपल्या खवय्यांना करुन दिली आहे. येथे तुम्हाला नाष्टा म्हणून 2 पदार्थ खायला मिळतील.

1. बेडमी पुरी (खुसखुशीत तिखट पुरी) – बेडमी पुरीबरोबर तुम्हाला बटाट्याची भाजी/ छोले/ सोया चीप
2. पनीर चिल्ला, अलू चिल्ला, बेसन चिल्ला, प्लेन चिल्ला

bc

 

विशेष म्हणजे तुम्ही येथे भरपेट जेवणाचा आनंद घेऊ शकतात. आणखी महत्वाचं काय तर छोले, दाल मखनी इथे दिवसातून दोनदा धीम्या आगेवर तयार केले जातात. परंतु एकदा का खवय्यांच्या पत्रावळीत छोले भटुरे, दाल मखनी आली की काही तासात फस्त होते. त्यामुळे लवकर जा आणि सगळं फस्त व्हायच्या आता छोले भटुरे, दाल मखनी खाण्याचा आनंद घ्या.

छोले भटुरे खायला दिल्लीला जाल तेव्हा जाल, परंतु पुण्यात दिल्ली स्पेशल छोले भटुरेचा स्वाद चाखायचा  असेल तर ओय बीसीमध्ये नक्की जा.

                 bc

खातिरदारी (पत्ता) –

ओय बीसी, स्पॉट 16, सर्व्हे नंबर 16
सियमेन्स गेट नंबर 1 च्या समोर,
बालेवाडी हाय स्ट्रिट रोड,
बालेवाडी, पुणे – 411045

गुगल मॅप –
https://goo.gl/maps/5vY6JPFDUaQG3Cbg7

मोबाइल नंबर – 7385587033

bc

फेसबुक पेज लाईक करा – 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like