खुशखबर ! लवकरच ID कार्ड न दाखवता करा एअरपोर्टमध्ये ‘एन्ट्री’, जाणून घ्या ‘या’ 5 महत्वाच्या गोष्टी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात आता विमान प्रवास करणे आधिक सोपे आणि सहज होणार आहे. केंद्र सरकार आता विमान प्रवास देखील पेपरलेस करण्याच्या तयारीत आहे. या संबंधित तयारी पुर्ण करण्यात आली आहे. आता तुम्हाला विमान प्रवास करताना ओळख पत्र घेऊन जाण्याची आवश्यकता भासणार नाही. म्हणजे आता हे सहज होणार असून तुमचा चेहराच तुमची ओळख असेल. दिल्ली एअरपोर्टवर लवकरच ही सुविधा उपलब्ध होणार आहे.

काय आहे हा प्लॅन –

१. दिल्ली एअरपोर्टवर सध्या बोर्डिंग सिस्टम पूर्णता डिजिटल करण्यात आली आहे. प्रवाशांची एंट्री आता फेशिअल रिकॉग्निशनच्या द्वारे होणार आहे. म्हणजेच आता चेहरा स्कॅन करण्यात येणार आहे. यानंतर तुम्हाला एअरपोर्टवर एंट्री मिळेल. असे सांगण्यात येत आहे की, खासगी एअरलाइन्स विस्तार लवकरच एअरपोर्टवर फेशिअल रिकॉग्निशन बोर्डिंग सिस्टम ट्रायल सुरु करणार आहे.
२. इतर कंपन्या देखील यात सहभागी होऊ शकतात. तुमच्या चेहऱ्याला स्कॅन करुन तुमची ओळख पटवली जाईल. यानंतर विमानतळावर जाण्यापासून किंवा बोर्डिंग पर्यंत कशासाठी देखील कोणत्याही कागदपत्राची आवश्यकता भासणार नाही.
३. या डिजिटल बोर्डिंगच्या योजनेला डीजीयात्रा नाव देण्यात आले आहे. (DIGI YATRA- DIGITAL YATRA)
४. या योजनेत सहभागी होण्यासाठी कंपनी तुमचा फेशिअल रिकॉग्निशन डेटा घेईल. डीजीयात्रेचा अर्थ आहे. तुम्ही तुमचे आधार कार्ड, पासपोर्ट किंवा इतर ओळखपत्र फेशिअल रिकॉग्निशन एकदा सरकारी डेटा बेसवर अपलोड करावे. यानंतर तुमचा चेहरा एअरपोर्टवर स्कॅन करण्यात येईल. यामुळे तुम्ही कोणत्याही अडचणी शिवाय एअरपोर्टवर दाखल करु शकतात.
५. सध्या बंगळुरु, मुंबई आणि हैद्राबाद या एअरपोर्टवर डीजीयात्रा योजना सुरु करण्यात आली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –