SBI नं बाजारात आणलं नवीन ‘क्रेडिट’ कार्ड, ‘हे’ मोठे फायदे मिळणार, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आणि एयरलाइन कंपनी विस्तारा (Vistara) यांनी मंगळवारी एक प्रीमियम को-ब्रांडेड क्रेडिट कार्ड लॉन्च केले. यासाठी, वापरकर्त्यांना विनामूल्य रद्दीकरण (Free Cancellation), लाऊंज एक्सेस (Lounge Access) आणि अतिरिक्त फ्लायर पॉईंट्स (Extra Flyer Points) सारख्या सुविधांचा लाभ घेता येणार आहे.

विस्ताराने (Vistara) दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, क्लब विस्तारा एसबीआई कार्ड (Club Vistara SBI card) च्या दोन आवृत्त्या अनेक फायदे आणि वैशिष्ट्यांसह सादर करण्यात आल्या आहेत. यामध्ये विनामूल्य तिकिटे रद्द करणे, क्लब विस्तार सिल्वर / बेस क्लास सदस्यता आणि प्रवर्ग श्रेणी सुधारित करण्यासाठी व्हाउचर यासारख्या सुविधांचा समावेश आहे. याशिवाय ट्रॅव्हल इन्शुरन्स प्रोटेक्शन, लाऊंजचे व्हाउचर आणि आकर्षक बक्षीसही उपलब्ध आहेत.

विस्तारा एयरलाइंस ने कोलंबो साठी थेट उड्डाण सुरु केले.
याआधी, विस्तारा एयरलाइंस ने सोमवारी श्रीलंकेसाठी थेट उड्डाण सुरु केले. ही फ्लाइट मुंबईपासून श्रीलंकेची राजधानी कोलंबो पर्यंत चालवली जाणार आहे. कंपनी ने लिमिटेड पीरियड ऑफर नुसार १९ नोव्हेंबर पर्यंत रिटर्न तिकीट मात्र १६५४९ रुपयांमध्ये दिले.

हे आहे फ्लाइटचे वेळापत्रक
मुंबईहून हे विमान सकाळी ११ वाजता सुटेल आणि दुपारी १.२५ वाजता कोलंबोला पोहोचेल. त्यानंतर कोलंबोहून हे विमान दुपारी २.२५ वाजता सुटेल आणि सायंकाळी ०५ वाजता मुंबईला पोहोचेल.

१४९९ रुपयांमध्ये मिळणार कार्ड
एका वर्षासाठी विस्तारा एसबीआय कार्ड प्राइमसाठी ग्राहकांना २,९९९ सह जीएसटी भरावा लागेल. त्याचप्रमाणे क्लब विस्ताराला एसबीआय कार्डसाठी १४९९ पेक्षा अधिक जीएसटी भरावा लागणार आहे.

एसबीआय कार्ड चा आईपीओ सुरू होत आहे
SBI लवकरच SBI Card ची आईपीओ लॉन्च करणार आहे. SBI येणाऱ्या तीन महिन्यात या आईपीओ ची सुरुवात करणार आहे. काही काळापूर्वी SBI कार्डने बुक रनिंग लीड मॅनेजर्स (BRLM) साठी प्रस्ताव जारी केला होता. या आयपीओद्वारे SBI चे १४ टक्के भागभांडवल (सुमारे १३ कोटी शेअर्स) विक्री करण्याची आणि १००० कोटी रुपयांचे नवीन शेअर्स देण्याची योजना आहे. एबीसीआय कार्डात स्टेट बँक ऑफ इंडियाची ७४ टक्के भागीदारी आहे. उर्वरित भागभांडवल कार्लाइल ग्रुपकडे आहे.

Visit : Policenama.com