लठ्ठपणावरील उपचारात आशेचा किरण, रिसर्चमध्ये खुलासा – थंडीत व्हिटॅमिन A चरबी वितळवण्याची प्रक्रिया करते वेगाने

पोलिसनामा ऑनलाइन – नुकत्याच करण्यात आलेल्या संशोधनातून खुलासा झाला आहे की, थंडीतील हवामान माणसात व्हिटॅमिन ए ची मात्रा वाढवते. व्हिटॅमिन ए च्या मात्रेत वाढ झाल्याने सफेद रंगाची हानिकारक चरबी मेदयुक्त तपकिरी रंगाच्या चांगल्या चरबी उतीमध्ये बदलते. ज्यानंतर चरबी वितळण्यास सुरूवात होते आणि गरमी निर्माण होते. संशोधकांचे म्हणणे आहे की, लठ्ठपणात हे घट होण्याचे कारण बनते.

व्हिटॅमिन ए चे संशोधन देऊ शकते उपचार
वेगाने चरबी जाळण्यात व्हिटॅमिन ए ची महत्वाची भूमिका मेडयूनी वियाना डिव्हिजन ऑफ एंडोक्रीनोलॉजी अँड मेटाबोलिज्मच्या संशोधकांनी सिद्ध केली आहे. हे संशोधन मोलेकुलर मेटाबोलिज्म जनरलमध्ये प्रकाशित झाले आहे. रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, माणूस आणि सस्तन पाण्यांमध्ये दोन प्रकारच्या चरबीचा साठा असतो. एक, सफेद रंगाची हानिकारक चरबी आणि दुसरी तपकीरी रंगाची चांगली चरबी उती.

लठ्ठपणा वाढवण्याच्या दरम्यान, जास्त कॅलरी प्रामुख्याने सफेद चरबी वाढवते. या उलट तपकिरी रंगाची चरबी उर्जा मिसळवते आणि यामुळे गरमी निर्माण होते. संशोधकांचे म्हणणे आहे की, चरबीत बदलाची प्रक्रिया अतिरिक्त उर्जा स्त्रावाच्या सोबत होते. माणसाच्या शरीरात 90 टक्के सफेद रंगाच्या चरबीचा साठा असतो. हा साधारणपणे पोट, खालील भाग आणि वरील मांड्यांवर आढळतो. सफेद रंगाच्या हानिकारक मेदयुक्त उती तपकिरी रंगाच्या उती तपकिरी रंगाच्या चरबीत बदलल्याने वजन आणि लठ्ठपणाशी लढण्यासाठी नवा पर्याय सिद्ध होऊ शकतो.

थंडीत व्हिटॅमिन ए ची मात्रा वाढते
त्यांनी सांगितले की, संशोधनाच्या निष्कर्षावरून समजते की, लठ्ठपणाच्या उपचारात व्हिटॅमिन ए ची मुख्य भूमिका असण्यासह ऊर्जा मेटाबोलिज्मला प्रभावित करते. यासाठी यास लठ्ठपणाच्या उपचाराच्या विकासात आशाजनक दृष्टीकोण मानले जात आहे. मात्र, त्यांनी लठ्ठपणाने पीडित व्यक्तींना डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय व्हिटॅमिन ए चे सप्लीमेंट घेऊ नये, असा सावधानतेचा इशारा दिला आहे.

You might also like