Vitamin B12 | ‘या’ 5 संकेतांवरून जाणून घ्या शरीरात झाली आहे व्हिटॅमिन B-12 ची मोठी कमतरता, काम करणे बंद करतील अनेक अवयव

पोलीसनामा ऑनलाइन टीम – धावपळीच्या जीवनात व्हिटॅमिन बी 12 ची (Vitamin B12) कमतरता ही लोकांमध्ये एक सामान्य समस्या बनत चालली आहे. भारतात करोडो लोक या आजाराला बळी पडत आहेत. आकडेवारीनुसार, भारतातील किमान 47 टक्के लोक बी12 च्या (Vitamin B12) कमतरतेने ग्रस्त आहेत आणि फक्त 26 टक्के लोकांमध्ये त्याची पातळी योग्य असल्याचे आढळून आले आहे. हा धक्कादायक डेटा भारतीय लोकसंख्येमध्ये व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेबद्दल इशारा देणारा आहे.

 

व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता सुरुवातीला किरकोळ वाटू शकते परंतु दीर्घकाळापर्यंत त्याची कमतरता शरीराचे खूप नुकसान करू शकते. व्हिटॅमिन बी 12 शरीरातील लाल रक्तपेशी, डीएनए तयार करण्यास मदत करते, याशिवाय मेंदू आणि मज्जातंतूच्या पेशी मजबूत करते. त्याच्या कमतरतेमुळे अ‍ॅनिमियाचा धोका वाढतो. व्हिटॅमिन बी-12 शरीरासाठी खूप महत्वाचे आहे. त्यात कोबाल्ट असते जे इतर जीवनसत्त्वांमध्ये आढळत नाही, जे लाल रक्तपेशींसाठी खूप महत्वाचे आहे. पुरुषांनी दररोज 2.4 मायक्रोग्रॅम आणि महिलांनी 2.6 मायक्रोग्रॅम व्हिटॅमिन बी 12 चे सेवन केले पाहिजे आणि जर एखाद्यामध्ये त्याची कमतरता असेल तर ती त्वरित लक्षात घेऊन त्यावर प्रभावी उपचार केले पाहिजेत.

 

Vitamin B12 काय करते
व्हिटॅमिन B12 शरीरातील चेतापेशी (Nerve Cells) आणि रक्त पेशी (Blood Cells) निरोगी ठेवण्यास मदत करते. तसेच DNA बनवण्यास मदत होते. तुमचे शरीर स्वतःहून व्हिटॅमिन बी 12 बनवत नाही, ते अन्नातून घ्यावे लागते. व्हिटॅमिन बी 12 अंडी, मांस आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये आढळते. यासोबतच हे काही धान्ये, ब्रेड आणि यीस्टमध्येही आढळते.

 

Vitamin बी 12 च्या कमतरतेमुळे त्वचा, डोळ्यांच्या समस्यांसह न्यूरोलॉजिकल विकार होतात. त्यामुळे या कमतरतेकडे निर्देश करणार्‍या सर्व लक्षणांवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. ब्रिटनची सरकारी आरोग्य एजन्सी NHS ने व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेच्या काही लक्षणांबद्दल माहिती दिली आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही हे जाणून घेऊ शकता की तुम्हालाही या कमतरतेचा त्रास आहे की नाही.

व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेची प्रमुख लक्षणे
1. त्वचेचा रंग फिकट पिवळा पडणे
2. जीभेत दुखणे आणि तिचा रंग उतरणे
3. तोंडात फोड येणे
4. दृष्टीत अडचण
5. चिडचिड
6. डिप्रेशन

 

शास्त्रज्ञांच्या मते, व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता कोणत्याही वयोगटातील लोकांना होऊ शकते, परंतु 60 वर्षे आणि त्याहून जास्त वयाच्या लोकांना या कमतरतेचा त्रास होण्याची शक्यता असते. तसेच, जे शाकाहारी किंवा वीगन आहेत त्यांच्यासाठी पुरेसे व्हिटॅमिन बी 12 मिळवणे आव्हानात्मक असू शकते कारण ते बहुतेक प्राण्यांशी संबंधीत उत्पादनांमध्ये आढळते.

 

शरीराचे हे अवयव देतात व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेचे संकेत
एनएचएसने सांगितले की, व्हिटॅमिन बी12 वरील अनेक संशोधनात आम्हाला आढळून आले आहे की, हात, दंड, आणि पायावर व्हिटॅमिन बी12 च्या कमतरतेची लक्षणे दिसतात. या व्हिटॅमिनची कमतरता असलेल्या लोकांच्या शरीराच्या या भागांमध्ये विचित्र मुंग्या येतात. या स्थितीला ’पॅरेस्थेसिया’ म्हणतात.

या समस्या शरीरात असतील, परंतु याचा अर्थ असा नाही की तुमच्यात व्हिटॅमिन बी 12 ची नक्कीच कमतरता असेल. हे इतर अनेक कारणांमुळे देखील असू शकते. ज्यात मज्जातंतूंवर दाब, मज्जातंतू दुखणे, मज्जातंतूंचे आजार, रक्तपुरवठा कमी होणे, हायपरव्हेंटिलेशन, मधुमेह, मल्टीपल स्क्लेरोसिस, हायपरथायरॉईडीझम यासारख्या आजारांचा समावेश आहे. म्हणूनच हे महत्वाचे आहे की जर तुम्हाला ही लक्षणे असतील तर तुम्ही डॉक्टरांकडून तपासणी करून घ्या.

 

’पॅरेस्थेसिया’ मध्ये जळजळ- हात, पायांमध्ये होऊ शकते. या दरम्यान एखाद्याला वेदना जाणवत नाहीत आणि ही लक्षणे कोणत्याही संकेताशिवाय अचानक उद्भवतात. जेव्हा तुम्ही बसता किंवा झोपता तेव्हा ती बहुतेक शरीरात जाणवतात आणि तुम्हाला ते फक्त काही मिनिटांसाठी जाणवतात.

 

जीभ देखील देते व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेचे संकेत
व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे तोंडाची समस्या देखील होऊ शकते, ज्यामुळे फोड, जीभ सुजणे आणि लाल भडक होऊ शकते. जिभेच्या सूजेला ग्लोसिटिस म्हणतात जे व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेचे प्रमुख लक्षण आहे. त्यामुळे व्यक्तीला अशक्तपणा येतो आणि तोंडात फोड येण्यासारखी लक्षणे दिसू लागतात.

 

मेंदूवर व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेचा परिणाम
व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेचा मेंदूवर खूप वाईट परिणाम होत असल्याचे संशोधनातून समोर आले आहे. या दरम्यान, व्यक्ती अनेकदा गोष्टी विसरू लागतो. त्याला नवीन गोष्टी लक्षात ठेवता येत नाहीत आणि एकाग्रतेत अडचण येते. यामुळेच व्हिटॅमिन बी 12 मुळे त्रस्त लोकांमध्ये चिडचिडेपणा, वागणूक बदलणे, नैराश्य आणि स्मरणशक्ती कमी होण्याचाही सामना करावा लागतो.

लक्षणे दिसल्यास तपासणी आवश्यक
जर शरीरात व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेची चिन्हे दिसत असतील तर ताबडतोब डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घ्यावी. बी12 च्या कमतरतेचा धोका वृद्ध, मुले, शाकाहारी लोक आणि मधुमेही लोकांना जास्त असतो. म्हणूनच अशा लोकांनी त्यांच्या नियमित चाचण्या करून घ्याव्यात.

 

व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता टाळण्यासाठी काय खावे
Vitamin बी 12 हे एक पोषकतत्व आहे जे शरीरात नैसर्गिकरित्या तयार होत नाही. त्यामुळे हे जीवनसत्व भरपूर असलेले पदार्थ खाणे आवश्यक आहे. यासोबतच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्ही काही सप्लिमेंट्स घेऊ शकता.

 

व्हिटॅमिन बी 12 च्या काही सर्वोत्तम स्त्रोतांमध्ये अंडी, बीफ, पोर्क, हॅम, पोल्ट्री प्रॉडक्ट, मेंढी, शेलफिश, खेकडा,
दुग्धजन्य पदार्थ जसे की दूध, पनीर, दही आणि अंडी यांचा समावेश होतो.
अनेक प्रकारच्या धान्यांमध्येही हे मुबलक प्रमाणात आढळते.
मांसाहार करणार्‍यांना ही जीवनसत्त्वे शरीराला देणे जितके सोपे असते तितके शाकाहारी किंवा
शाकाहारी लोकांसाठी नसते. मात्र, पालक, बीटरूट आणि हरभरा हे त्याचे चांगले स्त्रोत आहेत.

सप्लीमेंट्स करू शकतात मदत
शरीर निरोगी ठेवण्यासाठी बॅलन्स्ड डाएट आवश्यक आहे. जर शरीराला फायदेशीर सर्व गोष्टी खाल्ल्या
तरीही शरीराला योग्य प्रमाणात पोषक द्रव्ये मिळत नसतील तर अशा परिस्थितीत सप्लिमेंट्स मदत करतात.
व्हिटॅमिन बी 12 मुख्यतः मांसाहारी आहारांमध्ये आढळते,
म्हणून शाकाहारी लोक त्यांच्या शरीरात हे जीवनसत्व टिकवून ठेवण्यासाठी सप्लीमेंट्सची मदत घेऊ शकतात.
येथे लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे सप्लीमेंट्स हा पर्याय कधीच असू शकत नाही.
हेल्दी डाएटमधून तुम्ही याचे सेवन करू शकता. सप्लिमेंट्स डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्या.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Vitamin B12 | the body gives these five signs when there is a deficiency of vitamin b12

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

NEMS School Pune | आजी आजोबांनी निभावली परीक्षकांची भूमिका; एनईएमएस शाळेचा अनोखा उपक्रम

 

Maharashtra Municipal Election | शिंदे गटासोबत युती करणार?, मनसेचं मोठं विधान

 

Pune Pimpri Crime | रिक्षा चालकाकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, वाकड परिसरातील घटना