Vitamin B6 Rich Foods | Vitamin B6 च्या कमतरतेमुळे होऊ शकतात Cancer सारखे जीवघेणे आजार, बचावासाठी खा ‘हे’ 4 Foods

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Vitamin B6 Rich Foods | व्हिटॅमिन बी 6, ज्याला पायरिडॉक्सिन (Pyridoxine) देखील म्हणतात, ते पाण्यात विरघळणारे जीवनसत्व आहे जे नैसर्गिकरित्या अनेक पदार्थांमध्ये आढळते, तसेच याचा फूड सप्लीमेंटमध्ये समावेश केला जाऊ शकते. या व्हिटॅमिनच्या मदतीने अनेक रोग रोखता येऊ शकतात आणि शरीरात रक्ताचे योग्य प्रमाण राखण्यास मदत होते. व्हिटॅमिन बी समृध्द अन्न खाण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे कॅन्सरसारख्या घातक आजाराचा धोकाही बर्‍याच अंशी कमी होतो. यासाठी कोणकोणत्या गोष्टी खाऊ शकतात ते जाणून घेऊया (Vitamin B6 Rich Foods).

 

व्हिटॅमिन बी 6 युक्त अन्न

1. दूध (Milk)
गाय आणि बकरीचे दूध आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे आणि याद्वारे व्हिटॅमिन बी 6 ची गरज देखील पूर्ण होते. जर या पोषक तत्वाची कमतरता असेल तर मज्जासंस्थेवर खूप वाईट परिणाम होऊ शकतो. सर्व वयोगटातील लोकांनी ते प्यावे.

 

2. सॅल्मन (Salmon)
सॅल्मन फिशला सीफूडमध्ये आरोग्यदायी आहाराच्या श्रेणीमध्ये ठेवले जाते, या फॅटी फिशमध्ये व्हिटॅमिन बी 6 मुबलक प्रमाणात आढळते जे आपल्या एड्रेनल हेल्थसाठी खूप महत्वाचे आहे. एड्रेनल ग्रंथी कॉर्टिसोल, एड्रेनालिन आणि अल्डोस्टेरॉनसह अनेक महत्त्वपूर्ण हार्मोन्स तयार करतात. याशिवाय सॅल्मन फिश हा कमी चरबीयुक्त आहार आहे आणि तो खाल्लयाने भरपूर प्रोटीनही मिळतात. (Vitamin B6 Rich Foods)

3. गाजर (Carrot)
गाजर हे असेच एक अन्न आहे ज्यात भरपूर पोषक तत्व आढळतात. मध्यम आकाराच्या गाजरमध्ये एक ग्लास दुधाइतके व्हिटॅमिन बी 6 आढळते. गाजर थेट चावून खाऊ शकता, सॅलड म्हणून खाऊ शकता.

 

4. पालक (Spinach)
हिरव्या पालेभाज्यांमध्ये पालक हा नेहमीच पौष्टिक आहार मानला जातो, त्यात व्हिटॅमिन बी 6 तसेच व्हिटॅमिन ए,
व्हिटॅमिन सी आणि आयर्न भरपूर असते. सॅलड किंवा ज्यूसच्या रूपात याचे सेवन केल्यास शरीराला भरपूर फायदे मिळतात.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Vitamin B6 Rich Foods | vitamin b6 rich foods cow goat milk salmon fish carrot spinach pyridoxine cancer nervous system

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MP Anil Bonde | …म्हणून राहुल गांधी आणि रावणामध्ये जास्त साम्य आहे, खा. अनिल बोंडे यांचं टीकास्त्र

Builder Paras Porwal Suicide | मुंबईतील प्रसिद्ध बिल्डर पारस पोरवाल यांची 23 व्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या

Ajit Pawar | ‘या’ कारणामुळे सर्व कार्यक्रम रद्द करून अजित पवार गेले थेट बारामतीला