Vitamin C Except Lemon | लिंबूशिवाय ‘या’ फळांतूनही मिळते पुरेसे ‘सी व्हिटॅमिन’; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Vitamin C Except Lemon | व्हिटॅमिन -सी आणि डी (Vitamin-C and D) असलेल्या गोष्टींचे सेवन केल्याने आपल्याला रोगप्रतिकारक शक्ती मजबूत (Strengthens Immune System) करण्यास मदत होते. लिंबू (Lemon) हे क जीवनसत्त्व भरपूर असणारे स्वस्त फळ आहे. मात्र गेल्या काही दिवसांत लिंबाच्या किमती खुप वाढल्या आहेत. त्यामुळे दररोज त्याचे सेवन करणे सामान्यांना परवडू शकत नाही. अशावेळी प्रश्न पडतो की लिंबाव्यतिरिक्त व्हिटॅमिन-सी मिळवण्यासाठी आहारात आणखी कोणत्या गोष्टींचा समावेश करता येईल? (Vitamin C Except Lemon)

 

१०० ग्रॅम लिंबात ५३ मिलीग्राम व्हिटॅमिन-सी मिळू शकते. त्याच वेळी, निरोगी राहण्यासाठी, दररोज प्रति व्यक्ती ६५-९० मिलीग्राम व्हिटॅमिन-सीचे प्रमाण (Vitamin C Level) आवश्यक आहे. लिंबाच्या वाढत्या किमतीमुळे लोकांना व्हिटॅमिन-सीसाठी इतर गोष्टींवर अवलंबून राहावे लागणार आहे. चला जाणून घेऊया लिंबू व्यतिरिक्त व्हिटॅमिन सीचे सेवन पुरेशा प्रमाणात केल्याने इतर कोणत्या गोष्टी मिळू शकतात? (Vitamin C Except Lemon)

 

संत्री (Orange) :
लिंबाव्यतिरिक्त संत्री, द्राक्ष, आवळा (Orange, Grapes, Amla) यासारखे इतर लिंबूवर्गीय फळांमध्येही व्हिटॅमिन सी पुरेशा प्रमाणात आढळते. मध्यम आकाराच्या संत्र्यात ७० मिलीग्राम व्हिटॅमिन सी असते. त्वचेसह पोटाच्या अनेक समस्यांमध्ये संत्र्याचे सेवन करणे चांगले. लिंबाच्या वाढत्या किंमतींमध्ये तुम्ही संत्र्याचा आहारात समावेश करू शकतात. त्याच वेळी, १०० ग्रॅम द्राक्षांमध्ये सुमारे ३२ मिलीग्राम प्रमाणात व्हिटॅमिन सी मिळू शकते.

 

किवी (Kiwi) :
किवी या फळाला इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठीही फायदेशीर मानलं जातं. या फळात भरपूर व्हिटॅमिन-सी असते. तसेच त्यात असलेले अँटिऑक्सिडंट्स शरीराला अनेक प्रकारच्या गंभीर आणि जुनाट आजारांपासून वाचवू शकतात. १०० ग्रॅम किवी फळात ९२ मिलीग्राम व्हिटॅमिन-सी मिळू शकते. दररोज एका किवी फळाचा आहारात समावेश नक्की करा.

हिरव्या भाज्या (Green Vegetables) :
हिरव्या पालेभाज्या आणि हिरव्या भाज्यात देखील व्हिटॅमिन सी आणि लोह पुरेशा प्रमाणात आढळते. उदाहरणार्थ, १०० ग्रॅम पालकमध्ये २८ मिलीग्राम व्हिटॅमिन सी असते. आपल्या अन्नामध्ये पालेभाज्यांचा समावेश करणे आरोग्यासाठी विशेषतः फायदेशीर ठरू शकते. लोहाबरोबरच व्हिटॅमिन-बी, फोलेट आणि व्हिटॅमिन-ए देखील हिरव्या भाज्यांमध्ये पुरेशा प्रमाणात आढळतात ज्याची शरीराला दररोज गरज असते.

 

टमाटा (Tomato) :
व्हिटॅमिन सी मिळवण्यासाठी टमाटा ही फळभाजी उत्तम मानली जाते. या चमकदार लाल टमाट्यामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते.
एक कप (१०० ग्रॅम) टमाट्यामध्ये सुमारे २५ मिलीग्राम व्हिटॅमिन सी असते. टमाट्यामध्ये आरोग्यास चालना देणारी इतर अनेक जीवनसत्त्वे देखील असतात.
यात अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म देखील आहेत जे तीव्र आजारांच्या धोक्यापासून शरीरास सुरक्षित ठेवण्यास उपयुक्त ठरू शकतात.

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Vitamin C Except Lemon | lemon price hike in india best source of vitamin c except lemon

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Radish Health Benefits | जाणून घ्या पोटाचा त्रास टाळण्यासाठी मुळा खाण्याची योग्य वेळ आणि पद्धत

 

Yoga Asanas For Neck Pain Relief | मानदुखी दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतात ‘ही’ आसने; जाणून घ्या

 

Skin Care Tips | उन्हाळ्यात तेलकट त्वचा होतेय?; मग ‘हे’ उपाय करा, होईल समस्या दूर