Vitamin D Deficiency | शरीरात ‘व्हिटॅमिन डी’च्या मोठ्या कमतरतेचे संकेत आहेत ‘ही’ 5 लक्षणे, बहुतांश लोक करतात दुर्लक्ष

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Vitamin D Deficiency | शरीरात व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे अनेक आजार तुम्हाला घेरतात. व्हिटॅमिन डी हाडांच्या मेटाबॉलिज्मसाठी देखील आवश्यक आहे. व्हिटॅमिन डी (Vitamin D Deficiency) हे चरबीमध्ये विरघळणारे जीवनसत्व आहे जे अन्नामध्ये असते किंवा शरीरात तयार होते. सूर्यप्रकाश हा व्हिटॅमिन डी चा उत्तम स्रोत आहे. जर तुमच्या शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता असेल तर तुम्हाला त्याची काही खास लक्षणे दिसतात.

 

‘व्हिटॅमिन डी’च्या कमतरतेची लक्षणे

1. वजन वाढणे (Weight gain)
व्हिटॅमिन डी शरीराला नायट्रिक ऑक्साईड देते. नायट्रिक ऑक्साईड हे एक महत्त्वाचे पोषकतत्व आहे, जे ओव्हर इटिंगपासून रोखते आणि मेटाबॉलिज्म वाढवते. त्यामुळे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे वजन वाढू शकते.

 

2. थकवा (Fatigue)
व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे थकवा जाणवतो. योग्यप्रकार जेवण केल्यानंतर आणि रात्री 7-8 तास झोपल्यानंतरही थकवा जाणवत असेल, तर ते शरीरातील व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे असू शकते.

 

3. मूडवर परिणाम (Effect on Mood)
विनाकारण उदास आणि दु:खी वाटणे ही देखील शरीरात व्हिटॅमिन डीच्या कमतरतेची लक्षणे आहेत. मूड सुधारण्यात सूर्यप्रकाशाची मोठी भूमिका असते. यामुळे मेंदूतील सेरोटोनिन हार्मोनचे उत्पादन वाढते जे आनंदी ठेवण्यास मदत करते. (Vitamin D Deficiency)

4. हाडे आणि सांध्यांमध्ये वेदना (Pain in bones and joints)
शरीरात कॅल्शियम शोषण्यासाठी व्हिटॅमिन डी आवश्यक आहे. जर शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता असेल तर कॅल्शियम पुरेशा प्रमाणात उपलब्ध होणार नाही आणि त्यामुळे हाडे आणि स्नायूंमध्ये समस्या निर्माण होऊ शकतात. दात निरोगी ठेवण्यासाठी कॅल्शियमचे प्रमाणही आवश्यक आहे. जर वारंवार पाठ किंवा स्नायू दुखत असतील तर ते शरीरात व्हिटॅमिन डीच्या कमतरतेचे लक्षण असू शकते.

 

5. केस गळणे (Hair loss)
व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे केस गळतात. हे पोषक तत्व केसांच्या फॉलिकल्सना वाढण्यास मदत करते. शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता असल्यास केसांच्या आरोग्यावर परिणाम होतो आणि केस गळण्याची शक्यता असते.

 

या गोष्टींचा आहारात करा समावेश

– मशरूम व्हिटॅमिन डीचा चांगला स्रोत आहे. अंड्यामध्ये व्हिटॅमिन डी देखील मुबलक प्रमाणात असते.

– गाईचे दूध, सोया दूध, संत्र्याचा रस या सर्व गोष्टींचे सेवन केल्यास फायदा होईल.

– याशिवाय फॅटी फिश, ट्यूना आणि सॉलमनचे सेवन करा.

– चीज, दूध, टोफू, दही, अंडी यासारख्या दुग्धजन्य पदार्थांचा आहारात समावेश करा. सकाळचे कोवळे उन अंगावर घ्या.

 

Web Title :- Vitamin D Deficiency | 5 signs of vitamin d deficiency

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sindhudurg District Bank Election | ‘ज्यांना अक्कल आहे त्यांच्या ताब्यात जनतेने जिल्हा बँक दिली’, नारायण राणे यांचा महाविकास आघाडीवर घणाघात

 

Sindhudurg District Bank Election Result | सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूक; राणे समर्थकांचा महाविकास आघाडीला दणका

 

Pune Crime | पुण्याच्या गुन्हे शाखेतील पोलिस निरीक्षक शिल्पा चव्हाण यांच्या आत्महत्येचं कारण आलं समोर