Vitamin D deficiency | ‘या’ लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष, असू शकते ‘व्हिटॅमिन डी’ची कमतरता

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Vitamin D deficiency | व्हिटॅमिन डी कडे हाडांच्या आरोग्याशी संबंधी म्हणून पाहिले जाते. पण त्याच्या कमतरतेमुळे स्नायूही कमकुवत होतात. जर तुम्हाला आजकाल शरीरात येथे दिलेली लक्षणे दिसत असतील तर तुमच्यात व्हिटॅमिन डीची कमतरता असू शकते. (Vitamin D deficiency)

 

ही आहेत व्हिटॅमिन डीच्या कमतरतेची लक्षणे

1 केस गळणे (Hair Fall) 
आजकाल तुमचे केस नेहमीपेक्षा जास्त गळत असतील तर सावध व्हा. कारण हे व्हिटॅमिन डी च्या कमतरतेचे लक्षण असू शकते. व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे केस गळतात. व्हिटॅमिन डी केसांच्या वाढीस मदत करते आणि त्यांची मुळे मजबूत करते. शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता असल्यास केसांच्या आरोग्यावर परिणाम होतो आणि केस गळण्याची शक्यता असते.

 

2. वजन वाढणे (Weight Gain)
अचानक वजन वाढणे हे देखील व्हिटॅमिन डी च्या कमतरतेचे लक्षण असू शकते. वास्तविक, व्हिटॅमिन डी आपल्या शरीराला नायट्रिक ऑक्साईड देते जे जास्त खाणे टाळते आणि चयापचय वाढवते. त्यामुळे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे वजन वाढू शकते. (Vitamin D deficiency)

 

3. थकवा (Fatigue)
7 ते 8 तासांची झोप घेतल्यानंतरही जर तुम्हाला थकवा जाणवत असेल आणि नेहमी आळस जाणवत असेल तर ते व्हिटॅमिन डी च्या कमतरतेचे लक्षण असू शकते.

 

4. मूड बदलणे (Change of Mood)
विनाकारण चिडचिड होणे आणि उदास वाटणे आणि रडणे हे देखील व्हिटॅमिन डीच्या कमतरतेचे लक्षण असू शकते. आपला मूड सुधारण्यात सूर्यप्रकाशाची मोठी भूमिका असते. हे तुमच्या मेंदूतील सेरोटोनिन हार्मोनचे उत्पादन वाढवते जे तुम्हाला आनंदी ठेवण्यास मदत करते.

5. सांधे आणि स्नायूंच्या वेदना (Pain in joints and muscles)
आजकाल तुम्हाला सांधेदुखीचा त्रास होत असेल तर ते व्हिटॅमिन डीच्या कमतरतेचे लक्षण असू शकते. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे, शरीरात कॅल्शियमची कमतरता असते, ज्यामुळे हाडे आणि स्नायूंमध्ये वेदना होतात. पाठ किंवा सांधे दुखत असल्यास व्हिटॅमिन डीची चाचणी करून घ्यावी.

 

या गोष्टी खाल्ल्याने व्हिटॅमिन डी वाढेल

मशरूम
अंडी
दूध
सोया मिल्क
संत्र्याचा ज्यूस
फॅटी फिश, ट्यूना आणि सॅल्मन

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Vitamin D deficiency | vitamin d deficiency do not ignore these symptoms there may be vitamin d deficiency

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Bath Tips | 15 मिनिटापेक्षा जास्त आंघोळ करणे आरोग्यासाठी नुकसानकारक, या 5 चूका करणे टाळा

Arthritis | यूरिक अ‍ॅसिड असे करा कंट्रोल, ‘या’ 5 उपायांनी होऊ शकते सांधेदुखीपासून सुटका

LIC Policy Rules | एलआयसी पॉलिसीचे हे काम लवकर करा, अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान, बदलले नियम; जाणून घ्या