Diet Tips : ‘कोरोना’पासून बचावासाठी जास्त घेवू नका व्हिटामीन D, किडन्या देतील उत्तर, ‘हे’ देखील आहेत 5 नुकसान, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   व्हिटॅमिन डी ला सनशाईन व्हिटॅमिन सुद्धा म्हटले जाते. जे तुमच्या आरोग्यासाठी खुप लाभदायक आहे. हे हाड आणि दातांसाठी खुप जरूरी आहे. व्हिटॅमिन डी खाल्याने कॅल्शियम शोषण वाढतवते, जे हाडे आणि दातांसाठी आवश्यक असते. अनेक संशोधनात आढळले आहे की, व्हिटॅमिन डीची कमतरता असणार्‍या लोकांना कोरोनाचा जास्त धोका असतो. याच कारणामुळे एक्सपर्ट व्हिटॅमिन डीची कमतरता पूर्ण करण्याचा सल्ला देतात. अनेक लोक यासाठी सप्लीमेंट घेतात. पण जास्त मात्रेत व्हिटॅमिनचे सेवनाचे अनेक दुष्परिणाम होऊ शकतात.

हे आहेत धोके

1 हायपरलकसीमिया

व्हिटॅमिन डीशी संबंधित ही एक मोठी समस्या आहे. हायपरलकसीमिया एक अशी स्थिती आहे ज्यामध्ये रक्तात कॅल्शियमची मात्रा जास्त असते. बद्धकोष्ठता, उच्च रक्तदाब आणि अनेक प्रकारच्या समस्या होतात.

2 किडनीसाठी हानिकारक

जास्त प्रमाणात व्हिटॅमिन डी झाल्यास किडनीच्या अनेक समस्या होऊ शकतात.

3 पचनक्रियेला धोका

पोटदुखी, बद्धकोष्ठता, अतिसार अशा पचनाशी संबधीत समस्या होतात.

4 हाडांचे नुकसान

व्हिटॅमिन डी जास्त झाल्याने हाडांवर नकारात्मक परिणाम होतो. यासाठी योग्यप्रमाणात कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीचे सेवन करा.

5 मळमळ, उलटी आणि भूख

शरीरात जास्त कॅल्शियम झाल्याने उलटी, मळमळ आणि भूक कमी होण्याचा त्रास होतो.