‘ड’ जीवनसत्व वाढविण्यासाठी करा ‘हे’ 2 ‘खास उपाय’, वाढेल ‘प्रतिकारशक्ती’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   जर रोग प्रतिकारशक्ती चांगली असेल तर कोरोना व्हायरसचा संसर्ग सुद्धा टाळता येऊ शकतो. विशेष म्हणजे कोरोनाच्या उपचारतही रोग प्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी औषधे दिली जात आहेत. शरीरातील रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यायाठी ड जीवनसत्व खुप महत्वाचे आहे. मांसपेशी, हाडांचा विकास, प्रतिकारशक्ती आणि कोशीका वृद्धीसाठी जीवनसत्व-ड आवश्यक असते. कॅल्शियमला पचवण्यासाठी सुद्धा जीवनसत्व-ड खुप आवश्यक आहे. हे कसे मिळवावे ते जाणून घेऊयात.

जीवनसत्व-ड कमी असण्याचे लक्षणे

थकवा जाणवणे

तणाव जाणवणे

हाडे दुखणे

4  केस गळणे

5  जखम भरण्यास वेळ लागणे

मुड स्विंग्स होणे

हाडे कमजोर होणे

8  जांघ, बसण्याच्या जागी दुखणे

कमतरतेची ही आहेत कारणे

1  जास्त सनस्क्रीनचा वापर करणे

2  उन्हात अंगावर न घेणे

3  प्रदुषण

4  घरात जास्तवेळ राहणे

5  योग्य आहार न घेणे

करा हे उपाय

रोज 10 ते 30 मिनिटे सुर्याच्या कोवळ्या उन्हात थांबा.

मासे, अंडी, कॉड लिवर तेल, मशरुम, ओयस्टर्स इत्याही जीवनसत्व-ड युक्त आहार घ्या.