होय, ‘या’ व्हिटॅमिनमुळं काही देशांमध्ये ‘कोरोना’ झाला ‘कमजोर’, कमी झालं नुकसान, जाणून घ्या

काही देशांमध्ये लोक कोरोनामुळे जास्त आजारी पडत आहेत, किंवा अधिक संख्येने मृत्युमुखी पडत आहेत. तर, काही देशांमध्ये रूग्ण आणि मृतांची संख्या खुपच कमी आहे. काही देश तर असे आहेत जेथे व्हिटॅमिन-डी मुळे कोरोना संसर्ग कमजोर पडला आहे किंवा असे म्हणता येईल की, कोरोना व्हायरसमुळे जास्त नुकसान झाले नाही. तर, ज्या देशांमध्ये व्हिटॅमिन-डी ची कमतरता होती तेथे कोरोना व्हायरसची प्रकरणे खुप वेगाने वाढली.

नॉर्वे, डेन्मार्क, फिनलँड, स्वीडन असे देश आहेत जेथे व्हिटॅमिन-डी लोकांचे सुरक्षा कवच बनले. या व्हिटॅमिनमुळे कोरोना व्हायरसचे संक्रमण कमी झाले आणि लोक कमी आजारी पडले, या देशात जास्त मृत्यूदेखील झाले नाहीत. कारण येथील लोकांच्या शरीरात व्हिटॅमिन डी ची मात्रा चांगली आहे.

ही माहिती युरोपीय शास्त्रज्ञांच्या एक टीमच्या संशोधनातून समोर आली आहे. हा रिपोर्ट आयरिश मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. या टीमच्या शास्त्रज्ञांचा दावा आहे की, ते युरोपीय देश जास्त प्रभावित झाले जेथे लोकांमध्ये व्हिटॅमिन-डी ची कमतरता होती.

व्हिटॅमिन-डी ची कमतरता असणारे युरोपीय देश आहेत, स्पेन, फ्रान्स, इटली आणि ब्रिटन. तर, अमेरिका, भारत आणि चीनच्या लोकांमध्ये सुद्धा व्हिटॅमिन-डी ची मोठी कमतरता दिसून आली. यामुळे या देशांमध्ये कोरोना व्हायरसमुळे लाखो लोक आजारी पडले आणि लाखो लोकांचा मृत्यू झाला.

व्हिटॅमिन-डी ची कमतरता असणार्‍या देशांमध्ये संसर्ग सुद्धा वेगाने पसरत आहे. शास्त्रज्ञांनी या युरोपीय देशांमधील लोकांच्या शरीरातील व्हिटॅमिन-डी चा अभ्यास करण्यासाठी 1999 पासूनचा डाटा काढून त्याचे अनालिसीस केले.

व्हिटॅमिन-डीच्या मागच्या डाटाची पडताळणी सध्याचा डाटा आणि कोरोना व्हायरसमुळे होणार्‍या मृत्यूदराशी करण्यात आली. तेव्हा समजले की, ज्या लोकांच्या शरीरात व्हिटॅमिन-डीची मात्रा चांगली आहे ते लोक कोरोनाने कमी प्रभावित झाले, त्यादेशांमध्ये कमी मृत्यू झाले.

व्हिटॅमिन-डी ची सर्वात जास्त कमतरता आशियाई आणि मुळ अश्वेत लोकांमध्ये आढळून आली, ज्यांचे ब्रिटन आणि अमेरिकेत जास्त मृत्यू झाले आहेत. लोकसंख्येच्या सरासरी व्हिटॅमिन-डी स्तर आणि कोरोना व्हायरस प्रकरणांची संख्या यामध्ये संबंध आहे.

नॉर्वे, फिनलँड आणि स्वीडनच्या भौगोलिक स्थितीमुळे येथे सूर्याची अल्ट्राव्हायलेट किरणे खुप कमी पोहचतात, जी व्हिटॅमिन डीची प्रमुख स्त्रोत आहेत. यासाठी या देशांतील लोक व्हिटॅमिन डी ची कमतरता पूर्ण करण्यासाठी दुग्ध उत्पादने जास्त घेत असतात.

शास्त्रज्ञांच्या टीमला आढळले की, भारत, चीनसह उत्तर गोलार्धात इतर अनेक देशात वर्षाच्या सुरूवातीच्या महिन्यांमध्ये थंडी होती. संसर्गापासून वाचण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले. लोक घरात अडकडून पडले. सूर्याची किरणे किमान 20 मिनिटे शरीरावर न पडल्याने शरीरात व्हिटॅमिन डी च्या कमतरतेने गंभीर रूप धारण केले.