Vitamin E Benefits | निरोगी शरीरासाठी आवश्यक आहे व्हिटॅमिन ई, मिळेल या गंभीर समस्यांपासून संरक्षण

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Vitamin E Benefits | निरोगी शरीरासाठी (Healthy Body) सकस आहार (Healthy Diet) आवश्यक असतो. सर्व प्रकारची जीवनसत्वे, खनिजे आणि प्रथिनांनी युक्त पदार्थांचा आहारात समावेश साधारणतः असतो. व्हिटॅमिन -सी आणि डी (Vitamin-C And D) याचीही शरीराच्या वाढीसाठी नितांत गरज असते (Vitamin E Benefits).

 

शरीराला विविध आजारांपासून दूर ठेवण्यासाठी व्हिटॅमिन ई (Vitamin E) हे फार महत्वाचे आहे. व्हिटॅमिन ई नैसर्गिकरित्या बियाणे, शेंगदाणे, काही फळे आणि भाज्या (Seeds, Nuts, Fruits And Vegetables) यामध्ये असू शकते. दररोज त्यांचे सेवन करणे आवश्यक मानले जाते. व्हिटॅमिन-ईच्या कमतरतेमुळे प्रामुख्याने त्वचा आणि केसांच्या समस्या (Skin And Hair Problems) उद्भवतात.

 

ऑक्सिडेटिव्ह तणावाची समस्या (Oxidative Stress Problem) –
अँटीऑक्सिडेंट गुणधर्म (Antioxidant Properties) असलेल्या शरीरात अँटीऑक्सिडेंट्स आणि आरओएसच्या संचयनातील असंतुलनामुळे उद्भवते. त्यामुळे विविध प्रकारचे गंभीर आजार होऊ शकतात. व्हिटॅमिन ई शरीरात एक शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट म्हणून कार्य करते (Vitamin E Benefits).

हृदयरोगाचा प्रतिबंध (Prevention Of Heart Disease) –
व्हिटॅमिन ईचे सेवन केल्याने उच्च रक्तदाब आणि खराब कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसेराइड्सची पातळी (High Blood Pressure And Bad Cholesterol And Triglyceride Level) नियंत्रणात राहण्यास मदत होते. या जीवनसत्वामुळे हृदयरोग होण्याचा धोका कमी होतो. संशोधनात असे दिसून आले आहे की, जे लोक व्हिटॅमिन ईचे नित्य सेवन करतात त्यांना हृदयरोगाचा धोका कमी होतो. रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी व्हिटॅमिन ई पूरक आहार म्हणून उपयुक्त आहे.

 

त्वचेला फायदे (Benefits To Skin) –
व्हिटॅमिन ईचे सेवन त्वचा आणि केस निरोगी ठेवण्यासाठी खूप उपयुक्त मानले जाते. एक्जिमासारख्या त्वचेचा विकार असलेल्या लोकांना व्हिटॅमिन-ई पूरक आहारांचा (Vitamin-E Supplements) फायदा होऊ शकतो.
यामुळे केसांची वाढही होते आणि केस गळणे थांबते. तसेच त्वचेला अनेक प्रकारे फायदा होऊ शकतो.

व्हिटॅमिन ईचे स्त्रोत (Sources Of Vitamin E) –
Vitamin E दैनंदिन आहारातून सहजपणे प्राप्त करता येऊ शकते. सूर्यफूल आणि सोयाबीनचे तेल, बदाम,
शेंगदाणे, लोणी, बीट, पालक, भोपळा आणि लाल शिमला मिरचीतही व्हिटॅमिन ई आढळते.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Vitamin E Benefits | vitamin e benefits for good health prevents from these diseases vitamin e
 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Healthy Chutney Recipe | स्नॅक्ससोबत आवश्य ट्राय करा टोमॅटो-खजूरची स्पेशल चटणी, लिहून घ्या ‘ही’ रेसिपी

 

Calcium | हाडांच्या मजबूतीसाठी एक ग्लास दूध पुरेसे नाही, ‘या’ 7 गोष्टी कॅल्शियमच्या पॉवरहाऊस

 

Fatty Liver Cure | फॅटी लीव्हरने असाल त्रस्त तर ‘या’ 5 फूड्सपासून ताबडतोब व्हा दूर; जाणून घ्या