‘स्ट्रेच मार्क्स’ घालवायचेत ? करा ‘हे’ घरगुती उपाय

पोलीसनामा ऑनलाइन टीम – महिलांना गरोदरपणानंतर त्वचेवर स्ट्रेच मार्क्स येतात. गरोदरपणात वजन वाढते आणि डिलिव्हरीनंतर पुन्हा कमी होत असल्याने त्वचेवर हे व्रण उमटतात. यामुळे महिलांना काही कपडे परिधान करण्यात अडचण येते. हे व्रण अनेकदा महागड्या क्रीम लावूनही जात नाहीत. विशेष म्हणजे काही घरगुती उपाय केल्याने यापासून सुटका होऊ शकते. कारण हे व्रण व्हिटॅमिन वापरून घालवता येऊ शकतात.

आहारात व्हिटॅमिन ए घेतल्यास हे व्रण जातात. यासाठी गाजर, फिश, एप्रिकॉट आणि बेल पेपरमध्ये कॅरीटिनच्या रूपात व्हिटॅमिन ए घ्यावे. हे त्वचेच्या दुरूस्तीसाठी उपयोगी असते. व्हिटॅमिन के हे सर्व प्रकार व्रण दूर करते. अनेकांना या बद्दल माहीत नसते. यासाठी आहारात स्प्राउट्स, कोबी, स्प्रिंग ऑनियनचा समावेश करावा. यामुळे व्रण व डार्क सर्कल्स देखील दूर होतात. व्रण घालवण्यासाठी व्हिटॅमिन सी देखील आहारात घ्यावे. हे त्वचेत कॉलेजन प्रॉडक्शन वाढवत असून नवीन त्वचा तयार करण्यास मदत करते. लिंबू, आवळा, संत्रे, द्राक्ष, यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी आढळते.

व्हिटॅमिन ई ला ब्युटी व्हिटॅमिनही म्हणतात. हेल्दी आणि ग्लोइंग त्वचेसाठी व्हिटॅमिन ई घेण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे डॅमेज स्किन सेल्स रिपेअर होऊन व्रण जातात. त्वचेवर व्हिटॅमिन ई युक्त बॉडी लोशन लावू शकता. रात्री झोपताना प्रभावित जागेवर व्हिटॅमिन ई कॅप्सूल लावता येऊ शकते. या व्यतिरिक्त आहारात एवाकाडो, बदाम, पालक, मोहरीच्या बिया यांचा समावेश केल्यास चांगला परिणाम दिसून येतो.

आरोग्य विषयक वृत्त –

बहुगुणी पालकाची भाजी खा ; आरोग्य राखा

हवेच्या प्रदुषणामुळे ही होतो अनियमित मासिक पाळीचा त्रास

पहाटे सेक्स केल्याने हार्ट अटॅकचा धोका होतो कमी

सिगारेटच्या धुरामुळे फुफ्फुसासह डोळयांनाही धोका !