Vitamins For Women | महिलांसाठी अतिशय आवश्यक आहे ‘हे’ व्हिटॅमिन्स, जवळपासही येणार नाहीत अनेक आजार

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Vitamins For Women | अनेक बाबतीत महिला आणि पुरुषांचे शरीर वेगवेगळे प्रतिसाद देते, त्यामुळे महिलांच्या शरीराला वेगवेगळ्या पोषक तत्वांची गरज असते. सहसा, महिला घरात उरलेले किंवा शिळे अन्न खातात, ज्यामुळे त्यांच्या आरोग्याचे खूप नुकसान होते. त्यांनी केवळ हेल्दी (Healthy) आणि ताजे अन्न खाल्ले पाहिजे. महिलांच्या विकासासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी आवश्यक व्हिटॅमिन्स कोणती, ते जाणून घेवूयात. (Vitamins For Women)

 

महिलांसाठी आवश्यक व्हिटॅमिन (Vitamins For Women Health)

1. व्हिटॅमिन ए (Vitamin A)
जेव्हा एखादी स्त्री 40 ते 45 वर्षांची होते तेव्हा तिच्या रजोनिवृत्तीला सुरुवात होते आणि त्यामुळे तिच्या शरीरात अनेक बदल होतात. ए जीवनसत्वाच्या मदतीने त्या स्थितीतील समस्येवर मात करता येते. यासाठी गाजर, पालक, भोपळ्याच्या बिया आणि पपई खा (Carrot, Spinach, Pumpkin Seeds, Papaya).

 

2. व्हिटॅमिन बी 9 (Vitamin B9)
व्हिटॅमिन बी 9 म्हणजेच फॉलिक अ‍ॅसिड हे गर्भवती महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचे पोषक तत्व आहे, जर त्यांच्या शरीरात या पोषक तत्वाची कमतरता असेल तर मुलांमध्ये जन्मजात दोषांची समस्या देखील उद्भवू शकते. यासाठी दैनंदिन आहारात यीस्ट, बीन्स आणि धान्यांचा समावेश करा.

 

3. व्हिटॅमिन डी (Vitamin D)
व्हिटॅमिन डीच्या माध्यमातून आपली हाडे मजबूत होतात, वाढत्या वयाबरोबर महिलांची हाडे कमकुवत होऊ लागतात, त्यामुळे कॅल्शियमसोबत व्हिटॅमिन डीचे सेवन करणेही खूप महत्त्वाचे आहे. यासाठी दिवसभरात 15 ते 30 मिनिटे उन्हात घालवा आणि दूध, चीज, मशरूम, फॅटी फिश आणि अंडी (Milk, Cheese, Mushrooms, Fatty Fish, Eggs) यासारख्या गोष्टी खा. (Vitamins For Women)

4. व्हिटॅमिन ई (Vitamin E)
महिलांसाठी व्हिटॅमिन ई खूप महत्वाचे आहे कारण त्याद्वारे त्वचा, केस आणि नखे सुंदर होतात. यासोबतच डाग आणि सुरकुत्याही गायब होऊ लागतात. यासाठी पीनट बटर, बदाम, (Butter, Almond) पालक असे खाद्यपदार्थ खाऊ शकता.

 

5. व्हिटॅमिन के (Vitamin K)
महिलांच्या शरीरात व्हिटॅमिन के पुरेशा प्रमाणात असल्यास त्यांना मासिक पाळी आणि बाळंतपणादरम्यान रक्तस्त्राव होण्याची समस्या कमी होते. यासाठी रोजच्या आहारात हिरव्या भाज्या आणि सोयाबीन तेलाचा समावेश करता येईल.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Vitamins For Women | importance of vitamins for womens health body girl a-b9-d-e-k nutrients pregnancy menopause

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Food For Liver | ‘हे’ खाल्ल्याने होणार नाही लिव्हर डॅमेज, होतील अनेक फायदे

 

Ringworm | खाजेमुळे त्रस्त झाला आहात का, या टिप्सद्वारे दूर करा Fungal Infection

 

White Hair Problem Solution | कमी वयात डोक्याचे केस का होतात पांढरे? जाणून घ्या कसा करावा बचाव