विठूरायाची पंढरी कार्तिकी एकादशीसाठी सज्ज

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन – विठूरायाची पंढरी कार्तिकी एकादशीसाठी सज्ज झाली आहे. कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेचा गाभारा, सभामंडपाला आकर्षक अशा रंगीबेरंगी फुलांची आरास करण्यात आली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील आठ महिन्यांनंतर बंद असलेले श्री विठ्ठलाचे मंदिर पाडव्याला उघडण्यात आले.

२६ नोव्हेंबरला कार्तिकी एकादशी असून, कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी २५ ते २७ नोव्हेंबरपर्यंत मंदिर बंद ठेवण्यात आले आहे.

एकादशीला भाविकांनी गर्दी करू नये म्हणून पंढरपूर आणि परिसरातील ११ गावांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

जिल्हा प्रशासनाकडून भाविकांना आपल्या गावातच कार्तिकी एकादशी करण्याचे आवाहन केले आहे.

कार्तिकी एकादशी दिवशी पहाटे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सपत्नीक श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा पार पडणार आहे.

You might also like