विव रिचर्ड्स म्हणतात ‘हा’ भारतीय गोलंदाज डेनिस लिलीपेक्षा देखील ‘खतरनाक’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – वेस्ट इंडिजचे माजी फलंदाज विव रिचर्ड्स यांनी एका वेगवान भारतीय गोलंदाजासह कौतुक केले असून तो ऑस्ट्रेलियाचे माजी वेगवान गोलंदाज डेनिस लिली यांच्यापेक्षाही घातक गोलंदाज असल्याचे म्हटले आहे.

विव रिचर्ड्स यांनी भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रित बुमरा याचे कौतुक करताना म्हटले कि, तो इतर गोलंदाजांपेक्षा वेगळा असून मी बुमराऐवजी डेनिस लिली यांचा सामना करणे पसंद करेल असे त्यांनी म्हटले आहे. बुमराविषयी बोलताना ते म्हणाले कि, बुमरा हा लिली यांच्या तुलनेत फार घातक गोलंदाज आहे. येणाऱ्या काळात तो मोठ्यामोठ्या फलंदाजांना त्रस्त करणार असून त्याची गोलंदाजी खेळणे सर्वात अवघड आहे.

त्याचबरोबर डेनिस लिली काय करतात हे आपल्याला कळत असे मात्र बुमराच्या बाबतीत ते लवकर कळत नाही. त्याचबरोबर रिचर्ड्स यांनी भारतीय कर्णधार विराट कोहली याचे देखील कौतुक केले.
दरम्यान, भारतीय संघ सध्या विंडीज दौऱ्यावर असून या दौऱ्यात भारतीय संघाने पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावावर पकड घेतली असून पुढील खेळात काय होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त