करदात्यांना दिलासा ! ‘विवाद से विश्वास’ योजनेची ‘अशी’ होणार मदत, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयकर विभागात प्रत्यक्ष कर संबंधित तक्रारींच्या निवारणासाठी ‘विवाद से विश्वास’ ही योजना आणली गेली आहे. या योजनेंतर्गत विवरण देण्याची डेडलाईन वाढवण्यात आली आहे. आता नवी तारीख 31 मार्च करण्यात आली आहे. याशिवाय या योजनेंतर्गत फी जमा करण्याची अंतिम तारीख वाढवून 30 एप्रिल केली आहे. आयकर विभागाने याबाबतचे ट्विट केले आहे.

आयकर विभागाने केलेल्या ट्विटमध्ये लिहिले, की सीबीडीटीने ‘विवाद से विश्वास’ कायद्यांतर्गत घोषणा करण्याचा कालावधी मर्यादा वाढवली आहे. त्यानुसार आता 31 मार्च, 2020 केली आहे. तसेच कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय पैसे भरण्याची तारीख 30 एप्रिल 2021 केली आहे. याचा फायदा हजारो करदात्यांना होणार आहे.

आत्तापर्यंत सव्वालाखपेक्षा जास्त प्रकरणांचे निराकरण
या घोषणेचा कालावधी 28 फेब्रुवारी होता. मात्र, आता ही तारीख वाढवण्यात आली असून, नवी तारीख 31 मार्च आहे. आत्तापर्यंत 1,25,144 प्रकरणांवर कार्यवाही करण्यात आली. हे एक 5,10,491 प्रकरणांच्या 24.5 टक्के आहे. सुमारे 97,000 कोटी रुपयांच्या मूल्याच्या विवादित कराच्या माध्यमातून ही योजना निवडली आहे.

विवादित शुल्काच्या निराकरणावर पर्याय
‘विवाद से विश्वास’ योजनेच्या आकलन संदर्भात विवादित कर, विवादित व्याज, विवादित दंड किंवा विवादित शुल्काच्या निराकरणासाठी पर्याय उपलब्ध केला जातो. याशिवाय विवादित कराचे 100 टक्के आणि विवादित दंड किंवा व्याज अथवा शुल्काचा 25 टक्के देऊन दीर्घकालीन प्रकरणांवर निराकरण केले जात आहे.

काय आहे ‘विवाद से विश्वास’ योजना
केंद्र सरकारकडून या योजनेची सुरुवात 17 मार्च, 2020 मध्ये करण्यात आली. ही एक अर्थ मंत्रालयाची योजना आहे. याचा मुख्य हेतू आहे, की लोकांच्या तक्रारींचे निराकरण करणे हे आहे. लोकांनी कोर्ट-कचेरीच्या प्रकरणात पडू नये. या योजनेचा लाभ घेऊन वादावर तोडगा काढावा. सध्या देशात प्रत्यक्ष कर संबंधित 4 लाखांपेक्षा जास्त प्रकरणे प्रलंबित आहे.