Vivek Agnihotri on Sharad Pawar | ‘द काश्मीर फाईल्स’ रिलीझ होण्याआधी पवार काय म्हणाले होते?; विवेक अग्निहोत्री ‘तो’ किस्सा सांगत म्हणाले – ‘पवारांचा ढोंगीपणा…’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Vivek Agnihotri on Sharad Pawar | ‘द काश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) चित्रपट रिलीझ झाल्यावर संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही टीका केली होती. या टीकेवर बोलताना चित्रपटाचे दिग्दर्शक (Director) विवेक अग्निहोत्री यांनी पवार चित्रपट रिलीझ होण्याआधी काय म्हणाले होते ?, याबाबत सांगताना त्यांच्यावर टीकाही केली आहे.

 

काही दिवसांपूर्वी मी शरद पवार (Sharad Pawar) आणि त्यांच्या पत्नीची विमान प्रवास करताना भेट झाली होती. त्यावेळी त्यांनी चित्रपटासाठी अभिनंदन करत आशीर्वाद दिले. मात्र मीडियासमोर त्यांना काय झालं माहिती नाही. त्यांचा उघड ढोंगीपणा (Hypocris) दिसत असतानाही मी आदर करत असल्याचं विवेक अग्निहोत्री यांनी म्हटलं आहे.

पंतप्रधान कोणत्याही पक्षाचे असूदेत त्यांना देश एक ठेवणं महत्वाचं असतं. मात्र पंतप्रधान (PM Narendra Modi) म्हणतात चित्रपट चांगला आहे. महाराष्ट्र विधानसभा अधिवेशनावेळी (Assembly Session) दुपारी एकही आमदार सदनात नव्हता. ते सगळे चित्रपट पाहायला गेल्याचं विरोधी पक्षनेत्यांनी सांगितंल मात्र जर असंच सुरु राहिलं तर देशात एकता (Unity) राहणार नाही, असं शरद पवार यांनी म्हटलं होतं.

 

दरम्यान, विवेक अग्निहोत्री यांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेनंतर राष्ट्रवादीचे नेते (NCP Leaders) काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

Web Title :- Vivek Agnihotri on Sharad Pawar | vivek agnihotri director of the kashmir files has taunt to ncp chief sharad pawar

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा