अखेर विवेकने मागितली माफी ; वादग्रस्त ट्विट हटवले

मुंबई : वृत्तसंस्था – अभिनेता विवेक ओबेरॉयने काल एक मिम्स ट्विटरवर शेअर केले होते. त्या मिम्समध्ये अभिनेत्री ऐश्वर्या राय यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी करण्यात आली होती. त्यामुळे त्याच्यावर चहुबाजूनी टीका होत होती. सोशलमिडीयावर देखील विवेक ओबेरॉयला ट्रोल करण्यात आले. चहूबाजूंनी टीका होत असतानादेखील त्याने माफी मागण्यास नकार दिला होता. महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि राष्ट्रीय महिला आयोगाने विवेकला नोटीस पाठवून खुलासा करायला सांगितले होते. अखेर त्याने माफी मागून या प्रकरणावर पडदा टाकला आहे.

विवेक ओबेरॉयने ते वादग्रस्त ट्विट डिलिट करून माफी मागितली आहे. माझ्या ट्विटमुळे कोणत्याही महिलेला दुःख झाले असेल तर माफी मागतो आणि माझे ट्विट डिलिट करतो, असे विवेक म्हणाला आहे. “लोकं म्हणत आहेत कि, माफी मागा. माफी मागण्यास मला काहीही हरकत नाही. पण मला सांगा मी काय चुकीचं केलं आहे? जर मी काही चुकीचे केले असेल तर मी माफी मागेन. मला असे वाटत नाही कि मी काहीही चुकीचं केलं नाही. कोणीतरी ते मिम ट्विट केले होते, मी फक्त त्यावर हसलो”, असे विवेक ओबेरॉयने म्हटले होते.

दरम्यान राष्ट्रीय महिला आयोगाने विवेकला नोटीस पाठवून उत्तर मागितले होते. महिलांविषयी केलेल्या अपमानजनक टिप्पणीविषयी समाधानकारक उत्तर द्या, असे नोटीसमध्ये आयोगाने म्हंटले होते.

काय होते त्या ट्विटमध्ये?

विवेकने ट्विटरवर एक फोटो शेअर केला होता. त्या फोटोमध्ये तीन भाग करण्यात आले होते. पहिल्या भागात ओपीनियन पोल असं लिहीत ऐश्वर्या आणि सलमानचा एकत्रित फोटो दाखवण्यात आला होता तर दुसऱ्या भागात एक्सिट पोल असं लिहीत विवेक ओबेरॉय आणि ऐश्वर्या राय यांचा फोटो दाखवला होता आणि शेवटच्या भागात रिझल्ट असे लिहून ऐश्वर्या राय, अभिषेक बच्चन व त्यांची मुलगी आराध्या यांचा एकत्रित फोटो लावण्यात आला होता.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like