होय, माझा ‘विवेक’ सुटला आता मी माफी मागतो : विवेक ओबेरॉय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय सोमवारी तेव्हा वादात सापडला जेव्हा त्याने ऐश्वर्या रॉयचा फोटो ट्विट करत खिल्ली उडवली होती. विवेकच्या या ट्विटनंतर सोशल मीडियावर त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली. आता अशी माहिती समोर आली आहे की, विवेक ओबेरॉयने त्याचे हे ट्विट डिलिट केले असून त्याने माफीही मागितली आहे. यासंदर्भात विवेकने ट्विट केले होते. आपल्या ट्विटमध्ये विवेक म्हणाला की, “जर एखाद्या महिलेला माझ्या ट्विटमुळे वाईट वाटले असेल किंवा भावना दुखावल्या गेल्या असतील तर, मी माफी मागतो आणि ते ट्विटही डिलीट करतो.” विवेक ओबेरॉयने एक्झिट पोल (Exit Poll) आणि ऐश्वर्या रॉयचा (Aishwarya Rai) फोटो एकत्र करत एक ट्विट केलं होतं. हे ट्विट प्रचंड व्हायरल झालं होतं.

सोमवारी याबाबत महिला आयोगाने विवेकला नोटीस पाठवत स्पष्टीकरण मागितलं होत. याशिवाय अभिनेत्री सोनम कपूर आणि डीसीडब्ल्यू प्रमुख स्वाती मालिवाल यासोबत अनेकांनी विवेकवर टीकाही केली होती. याबाबत बोलताना विवेकने सोमवारी म्हटलं होतं की, जर मी काही चूक केलीच नाही तर मी कशाची माफी मागू ? एका वृत्तसंस्थेशी बोलताना विवेक म्हणाला होता की, “मला माफी मागण्यात कसलीच अडचण नाही. परंतु मला हे कळू द्या की, मी काय चुकीचं केलं आहे ? जर मी काही चुकीचं केलं असेल तर मी नक्कीच माफी मागेल. मला नाही वाटत की, मी काही चुकीचं केलं आहे.” तुम्हाला सांगू इच्छितो की, जे मीम विवेकने शेअर केलं होतं, ते तीन भागात होतं. त्यात ओपिनेयन पोल एक्झिट पोल आणि रिजल्ट असा समावेश होता. त्यात ओपिनियन पोलमध्ये ऐश्वर्या सलमान सोबत दिसत आहे, एक्झिट पोलमध्ये विवेक ओबेरॉय सोबत दिसत आहे तर रिजल्टमध्ये अभिषेक बच्चन, अराध्या यांच्यासोबत दिसत आहे.

राष्ट्रीय महिला आयोगाने ऐश्वर्या रॉयबद्दलचे मीम ट्विटरवर पोस्ट करण्याबाबत विवेक ओबेरॉयला नोटीस पाठवत स्पष्टीकरण मागितले होते. त्याला पाठवण्यात आलेल्या नोटीसीत आयोगाने म्हटले होते की, “विविध मीडियाद्वारे अशी माहिती समोर आली आहे की, तुम्ही ट्विट करत एक महिला(ऐश्वर्या) आणि एका मुलीबद्दल (अराध्या) अपमानकारक आणि महिला विरोधी पोस्ट शेअर केली होती. अशी माहिती आहे की, तुम्ही निवडणुकीतील संकल्पनांची महिलेच्या खासगी जीवनासोबत तुच्छ प्रकारे तुलना केली आहे.”

Loading...
You might also like