विवेक ऑबेरॉयचा मोदी लुक एकदा पहाच

मुंबई : वृत्तसंस्था – बॉलिवूड मधील चित्रपटांसाठी या वर्षाच्या सुरुवातीलाच अच्छे दिन आले. तसंच या वर्षात राजकारणातील तीन बड्या नेत्यांवरिल बायोपिक प्रदर्शित होणार आहेत. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, शिवसेना प्रमुख बाळासाबहेब ठाकरेंसह  आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर देखील बायोपिक येत आहे.

नरेंद्र मोदींवर येणाऱ्या या चित्रपटाचे नाव ‘पीएम नरेंद्र मोदी’ असं या चित्रपटाचं नाव आहे. या चित्रपटात अभिनेता विवेक ऑबेरॉय हा प्रमुख भुमिकेत असणार आहे. मागील आठवड्यातच विवेकच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली होती. त्यावरून सोशल मीडियावर विवेकची खल्लीही उडवण्यात आली होती.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते चित्रपटाच्या पोस्टरचं अनावरण करण्यात आलं. मात्र नुकत्याच प्रदर्शित करण्यात आलेल्या ‘पीएम नरेंद्र मोदी’च्या पहिल्या वहिल्या पोस्टरमध्ये विवेक ओळखूही येत नाही. विवेकच्या या लुकचे  अनेकांनी कौतुकही केले आहे.
दरम्यान, हा चित्रपट एकूण २३ भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. दिग्दर्शक उमंग कुमार हे या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. तर चित्रपटात विवेकसोबत ज्येष्ठ अभिनेते परेश रावलही मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.