ऐश्वर्याच्या आयुष्यातून ‘Exit’ झालेला ‘हा’ अभिनेता ‘Exit Poll’ च्या पोस्टवरून ट्रोल

मुंबई : वृत्तसंस्था – सतराव्या लोकसभेचं अखेरचं मतदान संपताच एक्झिट पोल हाती यायला सुरुवात झाली आहे. एक्झिट पोल सुरु झाल्यापासून अनेक तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. एक्झिट पोलमध्ये भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (NDA) स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे. भाजपचं स्वबळावर सरकार स्थापनेचं स्वप्न मात्र पूर्ण होणार नाही, असं बहुतेक एक्झिट पोलमध्ये वर्तवलेल्या अंदाजावरून स्पष्ट झालं आहे. एक्झिट पोलच्या या चर्चेमध्ये बॉलीवूडही मागे नाही. विवेक ओबेरॉयने एक्झिट पोल कसे असतात? हे सांगण्यासाठी विवेक ओबेरॉयने चक्क ऐश्वर्या रायचा आधार घेतला आहे. विवेकने आपल्या सोशल अकाऊंटवर एक्झिट पोलच्याविषयी एक पोस्ट शेअर केली आहे.

काय आहे पोस्ट –
या पोस्टमध्ये तीन फोटो आहेत. पहिल्या फोटोत ऐश्वर्या राय सलमान खानसोबत असलेला फोटो आहे. त्याखाली ओपिनियन पोल असे लिहिले आहे. दुसऱ्या फोटोत विवेक ओबेरॉय आणि ऐश्वर्या राय असा फोटो आहे. त्या फोटोत एक्झिट पोल असे लिहिले आहे. त्यानंतर अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय आणि आराध्या यांचा फोटो आहे त्याफोटोखाली रिझल्ट असं लिहिलं आहे. विवेकने ही पोस्ट शेअर करताना त्यासोबत लॉफिंग इमोजी पोस्ट केली आहे. सोबत ‘नो पॉलिटिक्स हिअर, जस्ट लाईफ’ असे लिहिले आहे. हे मीम विवेक ओबेरॉयने तयार केलेले नाही. मात्र ते शेअर केले आहे.

त्याने शेअर केलेल्या या पोस्टमुळे त्याला चांगलेच ट्रोल केले जात आहे. विवेकच्या या ट्वीटवर पॉझिटीव्ह कमेंट कमी आणि उपदेश अधिक सुनावले गेले आहेत. तुला असं वागणं शोभत का असा प्रश्न विचारला आहे तर काहींनी ऐश्वर्या रायच्या व्यक्तीगत आयुष्यावरून तू टीपण्णी का करतो आहेस ? असा प्रश्न विचारला आहे.

Loading...
You might also like