‘भाईजान’ सलमानसोबत असलेल्या 17 वर्षांपूर्वीच्या भांडणावर पुन्हा एकदा बोलला विवेक ओबेरॉय !

पोलीसनामा ऑनलाईन टीम : बॉलिवूड स्टार विवेक ओबेरॉय आणि सलमान खान यांच्यात अभिनेत्री ऐश्वर्या रॉयवरून असलेलं वैर साऱ्यांनाच माहिती आहे. विवेकनं 2003 साली सलमानवर आरोप करत म्हटलं होतं की, सलमाननं त्याला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. यानंतर कधी कोणी एकमेकांवर कमेंट केली नाही. अलीकडेच विवेकनं यावरील मौन सोडत यावर भाष्य केलं आहे.

एका मुलाखतीत बोलताना तब्बल 17 वर्षांनंतर विवेकनं यावर भाष्य केलं आहे. विवेक म्हणाला, “आता ही गोष्ट खूप जुनी झाली आहे. माझ्या वैयक्तीक आयुष्यात मी आता अशा ठिकाणी पोचलो आहे की, या सगळ्या गोष्टी मला खूप लहान वाटतात. या निगेटीव्ह गोष्टींवर जर आपण बोलत राहिलो तर यातून काहीही साध्य होणार नाही. आपण सकारात्मक गोष्टींवर बोलायला हवं. जे झालं ते विसरून पुढे जायला हवं. माझा कोणावर राग किंवा नाराजी नाही.”

View this post on Instagram

In hazy crazy Dilli!

A post shared by Vivek Oberoi (@vivekoberoi) on

2003 साली विवेकनं एक प्रेस कॉन्फरंस घेतली होती. यात त्यांन सांगितलं होतं की, सलमान खाननं त्याला 29 मार्च 2003 रोजी रात्री 12.30 पासून सकाळी पहाटे 5 वाजेपर्यंत तब्बल 41 कॉल केले आणि शिव्या घातल्या. इतकंच नाही तर जीवे मारण्याची धमकीही दिली. पंरतु नंतर त्यानं असंही कबुल केलं की, सलमान विरोधात प्रेस कॉन्फरंस घेऊन त्यानं चूक केली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like