मोदींसोबत सेल्फी घेणाऱ्या ‘त्या’ कलाकारांना विवेक ओबेरॉयने मारला असा टोमणा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉयचा पीएम नरेंद्र मदी हा बायोपिक सिनेमा सध्या वादात सापडला आहे. दरम्यान निवडणूक आयोगानेही लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया होईपर्यंत या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थिगितीही दिली आहे. विवेकला याचा फार संताप आला आहे. त्यामुळे त्याने बॉलिवूड कलाकारांचा समाचार घेतला आहे.

पीएम नरेंद्र मोदी या सिनेमाच्या या लढाईत बॉलिवूडच्या एकाही कलाकाराचा विवेकला पाठिंबा नसल्याने त्याने कलाकारांना टोमणा मारत म्हटले आहे की, “पीएम नरेंद्र मोदी यांच्यासोबत सेल्फी घ्यायला सगळेच समोर येतात. परंतु त्यांच्यावर बेतलेल्या चित्रपटाच्या बाजूने मात्र कोणीही उभे राहिले नाही.” असे विवेक म्हणाला. इतकेच नाही तर, “ही इंडस्ट्री कोणीचीही नाही. इते कुठेच ऐक्य नाही. भन्साळींचा ‘पद्मावत’ असो किंना शाहरुखचा ‘माय नेम इज खान’ अशा चित्रपटांना पाठिंबा देण्यासाठी एकही कलाकार समोर आला नाही.” असेही विवेकने म्हटले आहे.

विवेकचा हा टोमणा रणवीर सिंग, रणबीर कपूर, विकी कौशल, वरूण धवन, करण जोहर, रोहित शेट्टी, एकता कपूर अशा सगळ्यांसाठी होता. कारण अलीकडेच या सर्व कलाकारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती. याशिवाय त्यांच्यासोबत सेल्फी काढून तो सोशलवर शेअर केला होता. त्यामुळे आता विवेकच्या टोमण्याचा काही परिणाम होईल किंवा नाही आणि सदर कलाकार त्यावर नेमकी काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे नक्कीच उत्सुकतेचे ठरणार आहे.

त्याचा हा टोमणा, रणवीर सिंग, रणबीर कपूर, विकी कौशल, वरूण धवन, करण जोहर, रोहित शेट्टी, एकता कपूर अशा सगळ्यांसाठी होता. अलीकडे या सगळ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती आणि त्यांच्यासोबतचा सेल्फी सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यामुळे विवेकच्या या टोमण्याचा बॉलिवूडवर किती परिणाम होतो आणि हे स्टार्स त्यावर काय उत्तर देतात, ते बघूच.