‘त्या’ वादग्रस्त ट्विटनंतर विवेकचे अजून एक चुकीचे ट्वीट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेता विवेक ओबेरॉय ऐश्‍वर्या रॉयच्‍या मीमवरून ट्रोल झाला होता. या मीमवरून बराच वाद निर्माण झाला होता. त्‍यानंतर २४ मे ला विवेकचा पीएम नरेंद्र मोदी बायोपिकही रिलीज झाला. या सर्व घटनांमुळे विवेक सातत्याने चर्चेत राहिला आहे. आता विवेकचे आणखी एक ट्वीट व्‍हायरल झाले आहे. ज्‍यावरून तो चर्चेत आला आहे.

विवेकने ट्विटरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अभिनंदन करताना एक ट्‍विट केले आहे. ज्‍यामध्‍ये चुकीचे वाक्‍य लिहिले आहे. शिवाय, तो सलमान खानचा चित्रपट ‘भारत’चे प्रमोशन करताना दिसत आहेत. ट्रोल झाल्‍यानंतर विवेकने आपले ट्‍विट डिलीट केले आहे.

डिलीट केलेल्‍या ट्वीटमध्‍ये विवेकने लिहिले होते, ‘पीएम मोदी यांच्‍या शपथविधी समारंभासाठी निमंत्रण मिळणे माझ्‍यासाठी सन्‍मानाची बाबा आहे. गुजरातच्‍या मुख्यमंत्रीपासून ते #Bharat च्‍या पंतप्रधान बनण्‍यापर्यंत मी पीएम नरेंद्र मोदी भाई तिसर्‍यांदा शपथ घेताना पाहत आहे. माझ्‍यासाठी ही अभिमानाची बाब आहे. मी या ऐतिहासिक दिवसांत सहभागी झाल्‍याचा अनुभव घेत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेताना पाहत असल्याचे विवेकने म्हंटले आहे.

सलमान खान, ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चनशी संबंधित एका मीमवरून विवेक ट्रोलर्सच्‍या निशाण्‍यावर आला होता. हा वाद इतका वाढला की, विवेकला माफीही मागावी लागली आणि त्‍याचबरोबर, विवेकला ऐका चॅरिटी शोमधून बाहेरचा रस्‍ता दाखवण्‍यात आला होता. राष्‍ट्रीय महिला आयोगानेही विवेकला नोटिस पाठवली होती.