Vivek Phansalkar Mumbai CP | राज्यात एकीकडे राजकीय घडामोडी, दुसरीकडे विवेक फणसाळकर यांची मुंबई पोलीस आयुक्तपदी नियुक्ती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी विवेक फणसाळकर (Vivek Phansalkar Mumbai CP) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईचे सध्याचे पोलीस आयुक्त संजय पांडे (CP Sanjay Pandey) हे उद्या निवृत्त होणार आहेत. त्यामुळे राज्य सरकारने (State Government) फणसाळकर यांची मुंबई पोलीस आयुक्तपदी (Vivek Phansalkar Mumbai CP) नियुक्ती केली. राज्यातील अस्थिर राजकिय स्थितीत कायदा सूव्यवस्थेचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न निर्माण झालाय. अशा अवस्थेत वरिष्ठ आयपीएस अधिकारी (IPS officer) आणि ठाणे शहराचे माजी पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची भेट घेतली होती. ते मुंबई पोलीस आयुक्त पदासाठी इच्छुक आहेत. त्यामुळेच ते मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी गेले होते, अशी सूत्रांनी माहिती दिली.

 

विवेक फणसाळकर (Vivek Phansalkar Mumbai CP) मुळचे पुण्याचे (Pune) असून त्यांचे शिक्षण पुण्यात झाले. बी.ई. इलेक्ट्रॉननिक्स अँण्ड टेलिकॉम (B.E. Electronics and Telecom) असलेले विवेक फणसाळकर यांनी एमआयटी इंजिनिअरींग कॉलेजमध्ये (MIT Engineering College) टेल्कोचे लेक्चरर म्हणून करिअरची सुरुवात केली होती. हे करत असताना त्यांनी युपीएससीची परीक्षा (UPSC Exam) दिली आणि 1989 मध्ये महाराष्ट्र कॅडरमधून (Maharashtra Cadre) त्यांची निवड झाली.

 

विवेक फणसाळकर हे 1989 बॅचचे आयपीएस अधिकारी असून अकोला येथे अतिरिक्त पोलीस अधिक्षक पदी त्यांची पहिली वर्णी लागली होती. त्यानंतर राज्यपाल डॉक्टर पीसी असेक्झांडर यांचे एडीसी म्हणून विवेक फणसाळकर यांनी काम पाहिलं. वर्ध्याचे पोलीस अधिक्षक, बोसनिया येथे यु एस मिशन करता त्यांची निवड झाली होती.

विवेक फणसाळकर यांनी पोलीस आयुक्त नाशिक (Nashik Police Commissioner),
पोलीस अधीक्षक सीआयडी क्राईम नागपूर (Superintendent of Police CID Crime Nagpur),
फायनान्स आणि कंपनी अफेअर्स मंत्रालयात ज्वाईंट डायरेक्टर पदावर काम पाहिलंय.
टेक्सटाईल मंत्रालयात विजीलंस डारेक्टर, अतिरिक्त पोलीस आयुक्त ठाणे पदी त्यांनी काम पाहिलंय.

 

Web Title :- Vivek Phansalkar Mumbai CP | maharashtra thackeray government appointed vivek phansalkar as mumbai new police commissioner

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Jayant Patil | ही तुमची शेवटची कॅबिनेट होती का ? पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर जयंत पाटील म्हणाले…

 

CM Uddhav Thackeray | ‘मला माझ्याच लोकांनी दगा दिला, सहकार्याबद्दल धन्यवाद’; CM उद्धव ठाकरेंनी मानले आभार

 

Shivsena | एकनाथ शिंदे गटातील बंडखोर आमदारांकडून शरद पवारांविरुद्ध तुफान फटकेबाजी