Vivo Apex लॉन्च : इन डिस्प्ले कॅमेरा, कर्व्ड डिस्प्ले आणि 12GB रॅम, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी विवो (Vivo) ने एक फ्युचरिस्टिक स्मार्टफोन सादर केला आहे. हा Vivo Apex 2020 कॉन्सेप्ट स्मार्टफोन आहे. 2018 मध्येही कंपनीने Concept म्हणून Apex ला सादर केले होते.

यावेळी कंपनीने आतापर्यंतच्या नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाने सज्ज असलेल्या या स्मार्टफोनचे प्रदर्शन केले आहे. या स्मार्टफोनमध्ये इन डिस्प्ले सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे जो की 16 मेगापिक्सलचा आहे. डिस्प्लेवर कोणत्याही प्रकारचा नॉच देण्यात आलेला नाही आणि नाही पॉप अप सेल्फी कॅमेरा आहे.

Vivo Apex 2020 या स्मार्टफोनमध्ये एकही बटण नाही. खास गोष्ट अशी आहे की यात 60W फास्ट वायरलेस चार्जिंगला सपोर्ट देखील आहे जो सामान्यत: कोणत्याही स्मार्टफोनमध्ये दिसत नाही.

Vivo Apex 2020 मध्ये 6.45 इंचाचा फुल व्यू एजलेस डिस्प्ले देण्यात आला आहे आणि तो 120 डिग्री कर्व्ह्ड आहे. म्हणजेच बाजूने स्क्रीन वाकवण्यात आली आहे, जो वॉटर फॉल डिस्प्लेच्या नावाखाली प्रथम सादर झाला होता.

Vivo Apex 2020 मध्ये 5X – 7.5X ऑप्टिकल झूम असलेला कॅमेरा देण्यात आला आहे. व्हिडिओ रेकॉर्डिंगसाठी आपण यास विना जिंबल वापरू शकता, कारण यामध्ये स्टेबलायझिंग टेक्नोलॉजी देण्यात आली आहे.

कंपनीने सांगितले आहे की 16 मेगापिक्सलचे मॉड्यूल 6.2mm चे आहे आणि यास पेरिस्कोप डिझाइन देण्यात आली आहे. कॅमेरा मॉड्यूलची रचना जिंबलसारखी आहे आणि येथे 48 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. कंपनीने दावा केला आहे की ते ट्रॅडिशन ऑप्टिकल इमेज स्टेबिलायझेशन (OIS) च्या तुलनेने 200% चांगले असेल. तसेच विवो ने दावा केला आहे की, यामध्ये देण्यात आलेल्या 60W वायरलेस चार्जिंगद्वारे केवळ 20 मिनिटांत 2,000mAh बॅटरी चार्ज होईल.

आजकाल वायर्ड चार्जिंग देखील सामान्यत: इतक्या वेगाने फोन चार्ज करत नाहीत. तथापि, कंपनीने या स्मार्टफोनमध्ये बॅटरी किती पॉवरची असेल हे सांगितले नाही. Vivo Apex 2020 मधे कंपनीने 5G सपोर्ट दिला आहे. या स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 865 प्रोसेसर देण्यात आले आहे. यात आपल्याला 12 जीबी रॅमसह 256 जीबी इंटर्नल स्टोरेज मिळणार आहे. हा स्मार्टफोन Android 10 वर काम करतो आणि ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाइट कलर व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे.

जरी कंपनीने एक फ्युचरिस्टिक स्मार्टफोन लाँच केला असेल, परंतु याच्या किंमतीबद्दल आणि त्याच्या उपलब्धतेबद्दल काही माहिती दिलेली नाही. हा स्मार्टफोन बाजारात कधी येईल याबद्दल कंपनीने काहीही सांगितले नाही