फक्त 1,040 रुपयात खरेदी करा ‘Vivo’ चा ‘ट्रिपल’ कॅमेरा, 5000 mAh ‘बॅटरी’ असलेला फोन, अशी मिळेल ‘ऑफर’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – फ्लिपकार्डच्या ‘रिपल्बिक डे सेल’चा आजचा तिसरा दिवस आहे. या सेलमध्ये इलेक्ट्रॉनिक, ब्यूटी, फॅशनच्या वस्तूंवर मोठी सूट देण्यात आली आहे. या सेलमध्ये स्मार्टफोनवर उत्तम डिल्स् तुम्हाला उपलब्ध होतील. यातील जबरदस्त डील कोणती तर ती आहे विवो स्मार्टफोनची.

सेलमध्ये Vivo U10 चे 3GB रॅम/32GB स्टोरेज वेरिएंटवर ऑफर अंतर्गत 1,000 रुपयांपर्यंत डिस्काऊंट मिळत आहे. या फोनची मूळ किंमत 8,990 रुपये आहे परंतु या सेलमध्ये हा फोन फक्त 7,990 रुपयांत तुम्हाला उपलब्ध होईल. एवढेच नाही तर ऑफर अंतर्गत 7,950 रुपयांपर्यंतचे डिस्काऊंट मिळू शकते, या हिशोबाने हा फोन फक्त 1,040 रुपयांना ग्राहकांना उपलब्ध होऊ शकले.

काय आहेत या फोनचे खास फीचर –
Vivo U10 मध्ये फूल व्ह्यूव HD+ IPS 6.35 चा टचस्क्रीन डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्याचा एस्पेक्ट रेशो 19.5:9 आहे. डिझाइनचा विचार केला तर या स्मार्टफोनमध्ये इलेक्ट्रिक ब्लू प्लास्टिक बॉडी फोनमध्ये या फोनचा लूक अत्यंत आकर्षक दिसतो.

फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप –
Vivo ने vivo U10 मध्ये ट्रिपर रिअर कॅमेरा सेटअप दिला आहे. ज्यात 13MP सेंसरसह f/2.2 अपर्चर, 8MP वाइड अँगल लेंस f/2.2 अपर्चर आणि 2MP पोर्ट्रेट शॉट्सला f/2.4 अपर्चर देण्यात आला आहे. या तुम्ही अत्यंत दर्जेदार फोटो काढू शकतात. यासह फोनमध्ये 8MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. ज्याबरोबर f/1.8 अपर्चर देण्यात आला आहे.

या फोनची सर्वात खास बाब म्हणजे फोनची बॅटरी लाइफ, या फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. बॅटरीला 18W चा फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे.

फेसबुक पेज लाईक करा – 

You might also like