काय सांगता ! होय, ‘या’ फोनचा कॅमेरा डोळयासारखा फिरणार, ‘भन्नाट’ मोबाईल भारतात लॉन्च

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  अनेक कंपन्या आपल्या फोनमध्ये वेगवेगळे बदल करून ग्राहकांना आकर्षीत करत असता. या फोनमध्ये विविध अपडेटेड टेक्नॉलॉजी येत आहे. आता एकदम डोळ्यासारखा फिरणारा कॅमेरा विवोच्या मोबाइलमध्ये आला आहे. स्मार्टफोन कंपनी विवोने भारतात प्लॅगशीप Vivo X50 सिरीज लाँच केली आहे. कंपनीने एका ऑनलाईन कार्यक्रमात ही सिरीज लाँच केली आहे.

कंपनीने Vivo X50 आणि Vivo X50 Pro असे दोन स्मार्ट फोन भारतात प्रीमियम सेगमेंटमध्ये लाँच केले आहेत. यामध्ये गिंबल स्टाईलचे स्टेबलायझेशन देण्यात आले आहे. म्हणजेच या फोनचा कॅमेरा डोळ्याच्या बुबुळासरारखा फिरताना आणि स्टेबल फोटो क्लिक करेल. या सिस्टमचा कॅमेरा असलेला फोन पहिल्यांदाच बाजारात लाँच करण्यात आला आहे.

Vivo X50 ची किमंत

Vivo X50 या स्मार्ट फोनमध्ये 8 जीबी रॅम प्लस 128 जीबी स्टोरेज असून याची किंमत 34 हजार 990 रुपये आहे. तर 8 जबी रॅम प्लस 256 जीबी स्टोरेज असलेल्या फोनची किंमत 37 हजार 990 रुपये आहे. Vivo X50 Pro च्या 8 जीबी रॅम प्लस 256 जीबी स्टोरेजच्या सिंगल व्हेरियंटची किंमत 49 हाजर 700 रुपये आहे. Vivo X50 दोन रंगात असून ब्लू आणि ब्लॅक रंगात येवू शकतो. Vivo X50 Pro चे ग्रे कलर व्हेंरियंट आले आहे. या दोन्ही मोबाइलची प्री बुकिंग सुरु करण्यात आली आहे. 23 जुलैपर्यंत ही बुकिंग सुरु राहणार आहे.

या फोनचा पहिला सेल 24 जुलै रोजी होणार आहे. यानंतर हा फोन प्लिपकार्टवरून खरेदी करता येणार आहे. या कार्यक्रमात या फोनसोबत Vivo TWS Neo वायरलेस बड्स सुद्धा लाँच करण्यात आले आहेत. यात 22 तासांपर्यंत म्युझिक प्लेबॅक मिळेल. तसेच याचे वजन केवळ 4.7 ग्रॅम आहे. याची भारतीय मार्केटमध्ये 5 हजार 990 रुपये किंमत आहे.

Vivo X50 वैशिष्ट्ये

नवीन Vivo X50 आणि Vivo X50 Pro मध्ये 6.56 इंचाचा अमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. याचे रिझॉल्यूशन 237×1080 पिक्सल आहे. फोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. या फोनचे वजन 171.5 ग्रॅम इतके आहे. दोन्ही फोनमध्ये 765G प्रोसेसर आणि 8 जीबी रॅम पर्यंत लाँच करण्यात आले आहे. दोन्ही फोनची बॅटरी क्षमता वेगवेगळी आहे. Vivo X50 फोनमध्ये 4200 mAh बॅटरी देण्यात आली आहे. फोनमध्ये फ्रंटला 32 मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. हा कॅमेरा नाईट व्यू, पोर्ट्रेट, फोटो, व्हिडीओ, डायनामिक फोटो, स्लो मोशन, शॉर्ट व्हिडीओ आणि AR क्यूट शूट सपोर्ट दिला आहे.

कॅमेरा सेटअप

Vivo X50 Pro आणि Vivo X50 या दोन्ही रियरमध्ये क्वॉड कॅमेऱ्याच्या सेटअप दिला आहे. Vivo X50 मध्ये 48 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर शिवाय 13 मेगापिक्सलचा पोर्ट्रेट कॅमेरा, 8 मेगापिक्सलचा वाइड अँगल लेन्स आणि 5 मेगापिक्सलचा मायक्रो सेन्सर दिला आहे. Vivo X50 Pro मध्ये 48 मेगपिक्सलचा सोनी IMX598 मेन कॅमेरा सेन्सर दिला आहे. यामध्ये 13 मेगापिक्सलचा वाइड अँगल लेन्स आणि 5 मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स दिला आहे. Vivo X50 Pro कॅमेरेच्या जबरदस्त फीचर म्हणजे गिंबल कॅमेरा सिस्टम आहे. कॅमेऱ्यात नाइट फोटोग्राफी सिस्टम आणि अस्ट्रो देण्यात आला आहे. तसेच याच्या मदतीने स्टेबल व्हिडीओ रेकॉर्ड करता येऊ शकतो.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like