रशियाच्या घटनेत मोठा बदल ! 2036 पर्यंत राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत कायम राहू शकतात शकतात ‘व्लादिमीर पुतीन’, कायद्याने दिली मान्यता

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी त्या कायद्यावर स्वाक्षरी केला आहे, जे त्यांना २०३६ पर्यंत राष्ट्रपती पदवर राहण्याची योग्यता देत आहे. मागील वर्षी घटनात्मक बदलांच्या मतदानाला मिळालेल्या पाठिंब्यास औपचारिक मान्यता मिळाली आहे. गेल्या वर्षी १ जुलै रोजी झालेल्या घटनात्मक मतदानात अशा तरतुदींचा समावेश होता की पुतीन यांना आणखी दोन वेळा राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत उतरवू शकेल.

पुतीन यांची स्वाक्षरी केलेल्या माहितीशी संबंधित कायदा अधिकृतपणे वेबसाईटवर शेर करण्यात आला आहे. दोन दशकाहून अधिक काळ सत्तेवर असलेले ६८ वर्षीय पुतीन म्हणाले की ते २०२४ मध्ये त्यांचा वर्तमान कार्यकाळ समाप्त झाल्यानंतर याबाबतीत विचार करतील की त्यांना राष्ट्रपती पदासाठी दुसऱ्यांदा मैदानात उतरायचे आहे की नाही. मीडिया रिपोर्टनुसार, २०२४ नंतर रशियाच्या राष्ट्रपतिंचा कार्यकाळ ६-६ वर्ष होईल. जर पुतीन दोन्ही वेळेस जिकंतील तर ते पुढील १५ वर्षांपर्यंत राष्ट्रपती पदावर राहतील.

सर्वात अधिक काळ राज्य करणारा

असे करून पुतीन सर्वात अधिक काळात राज्य करणारे नेते बनतील. ते रशियावर राज्य करणाऱ्या जोसेफ स्टालिन आणि पीटर यांचा रेकॉर्ड तोडतील. सध्याच रशियाचे विरोधी पक्ष नेते एलेक्सी नावलनी यांच्या सुटकेसंदर्भात रशियामध्ये बरीच निदर्शने झाली. नवलनी यांनी पुतीन यांच्यावर गंभीर आरोप केले आणि ते त्यांचे टीकाकार मानले जातात. लोकांनी विरोधी नेत्यांना त्रास देण्याचा आरोप पुतीन यांच्यावर केला होता. दुसऱ्या प्रकरणात, विरोधी पक्षातील बहुतेक नेत्यांसह एका कार्यक्रमातून अनेक लोकांना अटक करण्यात आली.

रशियात ट्विटरची गती कमी ठेवली जाईल

रशियाच्या अधिकाऱ्यांनी ट्विटर संदर्भात म्हंटले आहे की याची गती मे च्या मध्यापर्यंत कायम ठेवली जाईल. तथापि, सध्या हे ब्लॉक केले जात नाही. असे यासाठी, कारण ट्विटरने बंदी घातलेली सामग्री लवकरात लवकर काढण्याचे काम चालू केले आहे. रशियाचे सरकार आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म यांच्यामध्ये सध्या ओढाताण होत आहे. या नव्या घोषनेला ‘ओढाताणचा विराम’ म्ह्णून पहिले जात आहे. ट्विटरवर हा आरोप लावला जात आहे की त्यांनी रशियामध्ये विरोध वाढविण्यामध्ये महत्वाची भूमिका निभावली आहे.