धक्कादायक ! रशियाचे राष्ट्रपती पुतिन यांच्या मुलींचे ‘प्रायव्हेट’ फोटो बदला घेण्यासाठी केले लीक

मास्को : वृत्तसंस्था – रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्या कुटुंबातील सदस्यांचे जीवन खुप सीक्रेट ठेवले जाते. यासाठी त्यांच्या कुटुंबातील लोकांचे खुप कमी फोटो आणि बातम्या मीडियाच्या समोर येतात. परंतु, आता रशियन राष्ट्रपतींच्याच एका माजी सहकार्‍याने पुतिन यांच्या मुलींचे फोटो लीक केले आहेत.

डेली मेलच्या रिपोर्टनुसार, पुतिन यांच्या दोन मुली मारिया आणि कॅटरीना यांचे फोटो लीक करण्यात आले आहेत. या दोघी पुतिन यांच्या पहिल्या पत्नीपासून झालेल्या मुली आहेत.

पुतिन यांच्या मुलींचे हे फोटो 1999 च्या नंतरचे आहेत, जेव्हा पुतिन प्रथमच रशियात सत्तारूढ झाले होते. हे फोटो माजी अरबपती सरजेई पुगाचेव्ह यांनी पुतिन यांना त्रास देण्यासाइी लीक केले आहेत, असे म्हटले जात आहे.

57 वर्षांचे पुगाचेव्ह एकेकाळी पुतिन यांच्या निकटवर्तीयांमध्ये होते. परंतु, याच आठवड्यात पुगाचेव्ह रशियाच्याविरूद्ध एका खटल्यात 10824 कोटी रूपये हरले.

1999 मध्ये पुतिन राष्ट्रपती होण्यामागे पुगाचेव्ह यांचेही योगदान असल्याचे समजले जाते. परंतु, सुमारे 10 वर्षानंतर पुगाचेव्ह रशिया सोडून फ्रान्सला आले आणि त्यांनी फ्रान्सचे नागरिकत्व घेतले.

पुतिन यांनी नेहमी आपल्या मुलांना बाहेरच्या जगापासून दूर ठेवले आहे. आता त्यांच्या मुलींचे वय 30 पेक्षा जास्त झाले आहे. तर, एका रिपोर्टमध्ये पुगाचेव्ह यांनी म्हटले आहे की, हे फोटो त्यांच्या वेबसाईटवर अगोदरपासूनच होते, परंतु कुणाचे लक्ष गेले नाही.

डेली मेलमध्ये छापण्यात आलेल्या रिपोर्टनुसार, पुतिन यांची 35 वर्षीय मुलगी मारिया मेडिकल रिसर्चमध्ये काम करत आहे. तिने नेदरलँडच्या एका व्यापार्‍यांसोबत विवाह केला आहे. तर 33 वर्षांची कॅटरीना रशियाच्या आर्टिफिशियल इन्टेलिजेंस इनिशिएटिव्हसोबत काम करत आहे.