रशियाचे राष्ट्रपती पुतीन यांना ‘गंभीर’ आजार

पोलिसनामा ऑनलाईन टीम – मॉस्को : जगातील सर्वात शक्तीशाली नेता आणि गेल्या 20 वर्षांपासून रशियावर राज्य करणारे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन पार्किन्सन आजाराशी झुंज देत आहेत. त्यामुळे ते पुढीलवर्षी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुतिन यांची प्रेयसी जिमनास्ट अलीना कबाइला आणि तिच्या दोन मुलींना पुतीन यांना राजीनामा देण्यास सांगितले आहे.

असा दावा केला जात आहे की मॉस्कोचे राजकीय विश्लेषक वलेरी सोलोवे यांनी ब्रिटीश वृत्तपत्र द सनला सांगितले की, रशियाचे राष्ट्रपती यांची प्रेयसी आणि त्यांच्या दोन मुली यांनी पुतिन यांच्यावर राजीनामा देण्यासाठी दबाव आणत आहेत. ते म्हणाले, ‘पुतीन यांचे एक कुटुंब आहे आणि त्यांचा रशियन राष्ट्रपतींवर खोल प्रभाव आहे. जानेवारीत पुतिन सर्व अधिकार दुसऱ्याला देऊन राष्ट्रपतीपद सोडू शकतात.

द सनच्या वृत्तानुसार, पुतिन यांची तब्येत खालावली आहे. नुकत्याच एका बैठकीत त्यांच्या हातात औषधं असल्याचे दिसले होते. पुतिन यांच्या राजीनाम्याच्या चर्चा अशा वेळी समोर आल्या आहेत जेव्हा रशियन सभासद एक विधेयक आणण्याच्या विचारात आहेत. या विधेयकामुळे त्यांची फौजदारी कारवाईतून आजीवन सुटका होईल.