तर आम्ही अमेरिकेवर हल्ला करणार

मास्को : वृत्तसंस्था – रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लामिदिर पुतिन यांच्या वक्तव्याने आंतरराष्ट्रीय राजकारणात खळबळ माजण्याची शक्यता आहे. अमेरिकेने युरोपात आपली क्षेपणास्त्रे पाठवली तर आपण अमेरिकेवर हल्ला करणार असे पुतीन यांनी म्हटले आहे. अमेरिकेच्या डिसिजन मेकिंग सेंटरला रशिया लक्ष करेल असे त्यांनी राष्ट्राला उद्देशून दिल्या गेलेल्या भाषणात म्हणले आहे.

अमेरिका-रशिया यांच्यात शीत युद्धाच्या वेळी करण्यात आलेला शस्त्र स्पर्धेसंदर्भातील करार स्थगित करण्याच्या घोषणेनंतर रशिया आणि अमेरिकेतील संबध बिघडले आहेत. अमेरिकेने रशियावर कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. याच संदर्भात रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी रशियाचा पहिल्यांदा युरोपात अण्वस्त्रधारी क्षेपणास्त्रे पाठवण्याचा कोणताही हेतू नाही. परंतु अमेरिकेने युरोपमध्ये अण्वस्त्रधारी क्षेपणास्त्रे तैनात केली तर आंतरराष्ट्रीय सुरक्षेची स्थिती गंभीर होईल म्हणून रशिया अमेरिकेच्या हल्ल्याचा प्रतिकार करेल असे पुतीन म्हणाले आहेत. अशा सर्व गंभीर स्थितीमुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी खळबळ माजण्याची शक्यता आहे.

अमेरिका आणि रशिया या देशामध्ये १९८७ ला आएनएफ (INF) करार झाला होता. अमेरिकेचे अध्यक्ष रोनाल्ड रेगन आणि त्यावेळीचे सोव्हिएत युनियनचे अध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह यांच्यात अण्वस्त्र स्पर्धा कमी करण्यासंदर्भात सदरचा करार झाला होता. तोच करार रद्द केल्याने दोन देशात तेढ निर्माण झाली आहे.