‘या’ कंपनीकडून 399 रूपयाच्या प्लॅनवर मिळणार तब्बल 150 GB ‘एक्स्ट्रा’ इंटरनेट डाटा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – टेलिकॉम इंडस्ट्रिज आणि मोबाइल यूजर्स यांचे सध्या मोठे हाल सुरु आहेत. रिलायन्स जिओने नुकतेच नॉन जिओ कॉलिंगसाठी पैसे आकारण्याचा निर्णय घेतला आहे. या दरम्यान वोडाफोन आयडिया आणि एअरटेल यांना मिळून रिलायन्स जिओला यामुळे ट्रोल देखील केले. कंपनींचे म्हणणे आहे की आम्ही दुसऱ्या नेटवर्कवरील कॉलवर पैसे आकारत नाही.

150 जीबी एक्स्ट्रा डाटा –
या दरम्यान आता वोडाफोन आयडियाने आपल्या सध्याच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना जास्त डाटा देण्याची घोषणा केली आहे. 399 रुपयात पोस्टपेड प्लॅनवर आता कंपनी 150 जीबी एक्स्ट्रा इंटरनेट डाटा देणार आहेत. एवढेच नाही तर याची वैधता देखील 6 महिने असणार आहे.

वोडाफोन 399 रुपयात रेड पोस्टपेड प्लॅनअंतर्गत सध्या यूजर्सला दर महिन्याला 40 जीबी डाटा मिळतो, याशिवाय अनलिमिटेड कॉलिंग आणि रोमिंग देखील मिळते. आता कंपनी या प्लॅन अंतर्गत ग्राहकांना 150 जीबी डाटा एक्स्ट्रा देणार आहे आणि त्याची वैधता देखील 6 महिने असेल.

399 रुपयात मिळणार या सुविधा –
सध्या वोडाफोनची या प्लॅनमध्ये 200 जीबी डेटा रोलओवर लिमिट आहे. म्हणजे ग्राहक पुढील महिन्यात मागच्या महिन्याचा उरलेला इंटरनेट डाटा वापरु शकतात. याशिवाय वोडाफोन प्ले, मोबाइल शील्ड आणि जी 5 चे देखील सब्सक्रिप्शन देते. वोडाफोनचा दावा आहे की या प्लॅन अंतर्गत ग्राहकांना 399 रुपयात एकूण 2,497 रुपयांचा फायदा मिळतो.

टेलिकॉम कंपनी सध्या अनेक पोस्टपेड प्लॅनवर आकर्षक ऑफर्स देत आहे. जेणेकरुन पोस्टपेड कस्टमर्स प्रीपेडवर स्विच करणार नाही. जिओ बाजारात आल्यानंतर दुसऱ्या कंपनीने देखील आपले प्रीपेड प्लॅन स्वस्त केले होते. यामुळे कमी किंमतीत जास्त फायदे प्रीपेडवर मिळतात. त्यामुळे कंपनी आपल्या कायम पोस्टपेड वापरणाऱ्या ग्राहकांना निराश करु इच्छित नाही.

Visit : policenama.com

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा…आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध,अशी घ्या काळजी