खुशखबर ! ‘Vodafone’च्या ‘रिचार्ज’वर मिळणार ‘गिफ्ट’, ‘एक्स्ट्रा’ डाटासह अनेक ‘ऑफर’, असा करा ‘क्लेम’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – वोडाफोनने आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी रिवॉर्ड प्रोग्राम सादर केला आहे. या ऑफरमध्ये वोडाफोन आपल्या ग्राहकांना प्रत्येक रिचार्जवर रिवॉर्ड देणार आहे. या स्कीममध्ये वोडाफोनने प्रत्येक रिचार्जवर गिफ्ट म्हणून एक ऑफर सादर केली आहे. पंरतू या ऑफरची एक समस्या अशी आहे की, रिवॉर्डसाठी तुम्हाला ७२ तासात यासाठी दावा करावा लागणार आहे.

वोडाफोनची ‘इनाम’ ऑफर –

वोडाफोनच्या प्रत्येक रिचार्जवर इनाम या ऑफर मध्ये तुम्हाला रिवॉर्ड म्हणून अनलिमिटेड कॉलिंग, कॅशबँक, अतिरिक्त डाटा, मॅसेज सर्विस आणि एसएमएसची सुविधा मिळेल. हे फायदे ग्राहकांना प्रत्येक रिचार्जवर मिळेल.

तर काही रिचार्जमध्ये ग्राहकांना अधिक रिवॉर्ड्स देखील मिळतील. या रिवॉर्डचा फायदा घेण्यासाठी ग्राहकांना ७२ तासाच्या आत *९९९# डायल करावा लागेल किंवा माय वोडाफोन अॅप डाऊनलोड करुन रिवॉर्डसाठी क्लेम करावा लागेल. याशिवाय ग्राहक वोडाफोनच्या वेबसाइटवर देखील रिवॉर्डसाठी क्लेम करु शकतात.

कंपनी आपला ग्राहक टिकवून ठेवण्यासाठी बाजारात अनेक नव नवीन प्लॅन लॉन्च करत आहेत. यातीलच हा एक रिचार्ज प्लॅन असणार आहे. यात कंपनी आपल्या ग्राहकांना रिचार्जच्या बदल्यात रिवॉर्ड देणार आहे ज्यामुळे कंपनीचा ग्राहक टिकून राहिलं. सध्या कंपनी नेटवर्क समस्येचा सामना करत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त