जाणून घ्या, ‘वोडाफोन-आयडिया’यांचे फायदेशीर 2 स्वस्त प्लॅन, किंमत फक्त 39 रुपये

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   ‘वोडाफोन-आयडिया’ यांनी आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी दोन नवे स्वस्त प्लान आणलेत. ज्यामध्ये 39 रुपये व 65 रुपयांच्या प्लॅनचा समावेश आहे. ‘वोडाफोन-आयडिया’ने यात 65 रुपयांच्या प्लॅनला रिलाँच केलेत. हे प्लॅन मागील वर्षी बंद केले होते.

‘वोडाफोन आयडिया’ याचा 65 रुपयांचा प्लॅनला मागील वर्षी डिसेंबर मध्ये बंद केले होते. आता या प्लॅनला पुन्हा एकदा बाजारात उतरवले आहे. या प्लॅनमध्ये 52 रुपयांचा टॉकटॉइम मिळत आहे. तसेच या प्लॅनमध्ये 100 एमबी डेटा मिळत असून या प्लॅनची वैधता 28 दिवसांची आहे.

‘वोडाफोन आयडिया’ याने एक 59 रुपयांचा प्रीपेड प्लॅन लाँच केलाय. ज्यामध्ये 30 मिनिटाचा लोकल नॅशनल व रोमिंग कॉलिंगची सुविधा मिळत आहे.

दरम्यान, हा प्लॅन सध्या निवडक सर्कलमध्ये उपलब्ध असून या प्लॅनची वैधता 28 दिवसांची आहे. हे दोन्ही प्लॅन सध्या गोवा आणि महाराष्ट्र सर्कलमध्ये उपलब्ध आहेत.

सर्वात स्वस्त कॉम्बो प्लॅन हा 39 रुपयांचा असून या प्लॅनची वैधता 14 दिवसांची आहे. यात युजर्संना 30 रुपयांचा टॉकटाइम मिळतो. तसेच 100 एमबी डेटा मिळतो. या प्लॅन अंतर्गत 1.5 पैसे सेकंद या दराप्रमाणे लोकल आणि नॅशनल कॉलिंग केली जाऊ शकते.