Vodafone-Idea | BSNL ला विक्री करणारे सरकार व्होडाफोन आयडियाचे सर्वात मोठे शेअरहोल्डर बनेल, टाटा टेलीमध्येही पार्टनर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Vodafone-Idea | भारत सरकारकडे (Government of India) आता व्होडाफोन आयडिया मध्ये (Vodafone-Idea) 35.8 टक्क्यांहून अधिक भागीदारी असेल. यासोबतच आता सरकारची टाटा टेलिसर्व्हिसेस (महाराष्ट्र) लिमिटेड (TTML) मध्येही भागीदारी असेल. टेलीकॉम ऑपरेटरने जाहीर केले आहे की त्यांच्या बोर्डाने स्पेक्ट्रम लिलावाच्या हप्त्याची रक्कम आणि एकूण महसूल (एजीआर) देय रक्कम इक्विटीमध्ये रूपांतरित करण्याच्या भारत सरकारच्या प्रस्तावास मान्यता दिली आहे. तसेच, सरकार आता Vi मधील सर्वात मोठे शेअरहोल्डर असेल. यासोबतच टीटीएमएलकडून 9.5 टक्के हिस्साहि सरकारला दिला जाणार आहे.

 

तथापि, या निर्णयामुळे Vi चे सध्याचे शेअरधारक कमकुवत होतील, त्याचा परिणाम गुंतवणूकदारांवर होईल. आता, व्होडाफोन समूहाचे प्रवर्तक शेअरधारक अनुक्रमे 28.5 टक्के आणि आदित्य बिर्ला समूहाचे (aditya birla group) सुमारे 17.8 टक्के असतील. याशिवाय इतरांचा सहभाग 17.9 टक्के असेल आणि सरकारचा वाटा आता 35.8 टक्के असेल. कंपनीने उघड केलेल्या तपशिलानुसार, व्याजाचे एकूण मूल्य सुमारे 58,254 कोटी रुपये आहे. यापैकी, टेलिकॉम ऑपरेटरने आधीच सरकारला 7,854 कोटी रुपये दिले आहेत, परंतु कंपनीकडे अद्याप सुमारे 50,000 कोटी रुपये बाकी आहेत.

सरकारच्या या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्याची माहिती व्होडाफोन आयडिया कडून (Vodafone-Idea) देण्यात आली.
ज्याचा परिणाम व्होडाफोन आयडियाच्या शेअर्सवर झाला आहे,
जे जवळपास 19 टक्क्यांनी घसरले आणि प्रति शेअर 13.40 रुपयांवर व्यवहार करत होते.

 

रिपोर्टनुसार असे समोर आले आहे कि, Vi चे शेअर्स सरकारला 10 रुपयांना वाटप करण्यात आले होते.
यामागील कारण म्हणजे 14.08.2021 च्या संबंधित तारखेला कंपनीच्या शेअर्सची सरासरी मूल्य सममूल्य पेक्षा कमी होते.
त्यामुळे सरकारला 10 रुपयांच्या सममूल्याने इक्विटी शेअर्स जारी करण्यात आले.

 

यापूर्वी ऑक्टोबर 2021 मध्ये दूरसंचार मदत पॅकेज मिळविण्यासाठी DoT ने व्होडाफोन आयडिया आणि एअरटेलला विविध पर्याय ऑफर केले होते, ज्यामध्ये चार वर्षांसाठी स्पेक्ट्रम आणि एजीआर देयांमध्ये विलंब आणि व्याजाचे इक्विटी शेअर्समध्ये बदलाचा समावेश आहे.

 

Vi च्या विरुद्ध , एअरटेलने सांगितले की ते स्पेक्ट्रम लिलावाशी संबंधित व्याज आणि सरकारी देय रकमेचे इक्विटीमध्ये रूपांतर करणार नाही.
सध्या, एअरटेलचे एकूण व्याज मूल्य रु. 43,980 कोटी आहे आणि कंपनीला अद्याप रु. 25,976 कोटी भरावे लागतील कारण तिने आधीच रु. 18,004 कोटी भरले आहेत.

 

Web Title :-  Vodafone-Idea | government selling to bsnl will become the largest shareholder of vodafone idea will also partner in tata tele

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा