Vodafone आणि Idea चा ‘दमदार’ प्लॅन, 6 महिन्यापर्यंत मिळणार 1.5GB डेटा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – टेलिकॉम सेक्टरमध्ये प्राइम वॉर सुरु आहे जिओ आणि वोडाफोन सध्या थोड्या थोड्या कालावधीमध्ये नवीन नवीन प्लॅन ग्राहकांसाठी उपलब्ध करून देत आहेत. ग्राहकांना सध्याच्या काळात जास्तीत जास्त इंटरनेट डेटा हवा आहे त्यामुळे कंपन्यांनी एक जीबी पासून ते तीन जीबी पर्यंत डेटा देणारे अनेक प्लॅन सुरु केलेले आहेत. नुकतेच वोडाफोन आयडियाची एक नवीन प्लॅन लॉंच केला आहे. 997 रुपयांचा हा लॉंग टर्म प्लॅन आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला रोज 6 महिन्यांपर्यंत 1.5 जीबी डेटा मिळेल. जाणून घेऊयात या प्लॅन्सचे सर्व फायदे.

997 रुपयांमध्ये 6 महिन्यांची व्हॅलिडिटी
997 रुपयांच्या या नव्या प्लॅनची व्हॅलिडिटी 6 महिन्यांची असणार आहे. यामध्ये तुम्हाला रोज 1.5 जीबी डेटा मिळेल. त्याचप्रमाणे प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज शंभर एसएमएस मिळतील. त्याचप्रमाणे यामध्ये वोडाफोन प्लेचे फ्री सब्सक्रिप्शन मिळणार आहे. ज्यामध्ये तुम्हाला ZEE5 प्रीमियम कंटेंट मिळेल. याची किमंत वार्षिक 999 रुपये आहे. सध्या हा प्लॅन ठराविक परिसरासाठी लागू करण्यात आलेला आहे मात्र लवकरच हा प्लॅन सगळीकडे लॉंच केला जाणार आहे.

वोडाफोनचे दोन नवीन प्लॅन
दोन दिवसांपूर्वी वोडाफोनने आणखी दोन नवीन प्लॅन सुरू केले आहेत. हे दोनीही प्लॅन 99 आणि 555 रुपयांचे आहेत. यापैकी 99 रुपयांची 18 दिवसाची वैधता आहे. या प्लॅनमध्ये, आपल्याला सर्व नेटवर्कसाठी दररोज अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 एसएमएस मिळतील.तसेच संपूर्ण वैधता कालावधीसाठी एकूण 1 जीबी डेटा दिला जाईल. 555 रुपयांचा व्होडाफोनचा प्लॅन कालावधी 70 दिवसांची आहे, ज्यामध्ये दररोज 1.5 जीबी डेटा आणि 100 एसएमएस उपलब्ध असतील. या योजनेत अमर्यादित कॉलिंग देखील उपलब्ध असेल. परंतु हा प्लॅन सध्या केवळ मुंबई पुरता उपलब्ध आहे.

जिओच्या 149 रुपयांच्या प्लॅनची चर्चा
जिओने 149 रुपयांचा एक प्लॅन सुरु केला आहे. यामध्ये रोज एक जीबी पर्यंत डेटा,जिओ टू जिओ अनलिमिटेड कॉलिंग परंतु जिओवरून दुसऱ्या नेटवर्कवर कॉलिंगसाठी 300 मिनिट आणि 100 एसएमएस देखील देण्यात आलेली आहे. मात्र या प्लॅनची वैधता 24 दिवसांची असणार आहे.

फेसबुक पेज लाईक करा –